bachu kadu nashik | Sarkarnama

फडणवीस सरकार सर्वाधिक निष्क्रिय : कडू 

संपत देवगिरे 
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

नाशिक ः गिरीष बापट यांनी शिफारस केलेल्या अपंगांच्या संस्थेला तात्काळ निधी द्यावा असा शेरा मुख्यमंत्र्यांनी मारला होता. त्या संस्थेला दोन वर्षे काहीच मिळाले नाही. असा सध्याच्या सरकारचा कारभार आहे. त्यामुळे सर्वाधिक निष्क्रीय सरकार सध्या महाराष्ट्रात सत्तेवर आहे. त्यामुळेच आम्हाला अपंगांच्या प्रश्‍नांसाठी जिल्ह्या जिल्ह्यात जावे लागते असा आरोप आमदार बच्चु कडु यांनी केला. 

नाशिक ः गिरीष बापट यांनी शिफारस केलेल्या अपंगांच्या संस्थेला तात्काळ निधी द्यावा असा शेरा मुख्यमंत्र्यांनी मारला होता. त्या संस्थेला दोन वर्षे काहीच मिळाले नाही. असा सध्याच्या सरकारचा कारभार आहे. त्यामुळे सर्वाधिक निष्क्रीय सरकार सध्या महाराष्ट्रात सत्तेवर आहे. त्यामुळेच आम्हाला अपंगांच्या प्रश्‍नांसाठी जिल्ह्या जिल्ह्यात जावे लागते असा आरोप आमदार बच्चु कडु यांनी केला. 

अपंगांच्या प्रलंबीत प्रश्‍नांसाठी कडु यांनी आज नाशिक जिल्हा परिषदेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांसह भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्याशी त्यांनी चर्चा केली. कडु यांच्या कार्यपध्दतीचा पुर्वानुभव लक्षात घेता यावेळी प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अधिकाऱ्यांनीही पुरेशी तयारी करुन यापूर्वीच त्यांच्या मागण्यांनुसार कार्यवाही करीत विविध मागण्या सोडविल्या होत्या. त्यामुळे ही चर्चा खेळीमेळीत झाली. कडु यांच्या मागण्यांवर तातडीने कारवाईचे आश्‍वासन मिळाले. 

कडू म्हणाले, "" सध्या राज्यात अतिशय निष्क्रीय सरकार सत्तेत आहे. ते शेतकऱ्यांच्या विरोधोत काम करीत आहेत. 59 साठ लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले आहेत. त्यातील दहा लाख अर्ज बोगस असल्याने चौकशी करु असे ते सांगतात. शेतकऱ्यांची चौकशी करण्याएैवजी बॅंकांचे रेकॉर्ड सरकारकडे असते त्यानुसार काम का होत नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्याचा कर्जघोटाळा त्यांना माहित नाही काय ? शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज घेऊन त्याची हमी कारखान्याने घेतली आहे. त्यात मोठा घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करावी असे आव्हान त्यानी दिले. 

ते म्हणाले, त्यांना कर्जमाफी तीस हजार कोटींवरुन दहा हजार कोटींच्या आत करायची आहे. चौकशी सरकार म्हणते. कारण हे 59 लाख अर्जांची त्रेपन्न निकषांनुसार तपासणी केली जाणार आहे. ते कसे होणार ? अशक्‍य आहे. त्यांना बुलेट ट्रेनला तीस हजार कोटी, समृध्दी महामार्गाला दहा हजार कोटी, सातवा वेतन आयोगासाठी पैसे खर्च करायचे आहे. शेतकऱ्यांना रडवुन रडवुन ते तुटपुंजी कर्जमाफी देतील. त्यामुळे त्यांच्यावर कोणाचाही विश्‍वास राहिलेला नाही. 

20 ऑक्‍टोबरला आंदोलन 
शेतकरी कर्जमाफी सुकाणू समितीतर्फे येत्या 20 ऑक्‍टोबरला आंदोलन केले जाईल. त्यादिवसापासून राज्यभर आंदोलन होईल. त्यात सुकाणू समितीचे सर्व घटक सहभागी होतील. हे आंदोलन अधिक तीव्र असेल. त्यामुळे सरकारने आता सामान्यांचा अंत पाहू नये असा इशारा त्यांनी दिला. 

संबंधित लेख