बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एमपीएससी विद्यार्थ्यांचा २७ ला पुण्यात मोर्चा

राज्य सरकारने विविध परीक्षा घेण्यासाठी सुरू केलेले महापोर्टबल बंद करून या लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात याव्यात, 72 हजार जागांची पदभरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
bachhu_kadu_
bachhu_kadu_

पुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 27 सप्टेबरला पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार बच्चू कडू मोर्चाचे नेतृत्व करणार असून या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 

राज्य सरकारने विविध परीक्षा घेण्यासाठी सुरू केलेले महापोर्टबल बंद करून या लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात याव्यात, 72 हजार जागांची पदभरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. 

सामूहिक कॉपी, अभ्यासक्रमानुसार परीक्षा न होणे, प्रश्नांची पुनरावृत्ती होणे, परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था नियोजित नसणे, वेळेवर परीक्षा न होणे, बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचे टाळणे या माध्यमातून महापोर्टलचा भ्रष्ट कारभार समोर आला आहे.

मात्र राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. परिणामी लाखो होतकरू विध्यार्थी या भ्रष्ट कारभाराचे बळी पडत आहेत. 27 सप्टेबरला पुण्यात सकाळी 11 वाजता शनिवारवाड्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 

आमदार बच्चू कडू यांनी या मोर्चायासाठी पुढाकार घेतला असून ते राज्यात विविध भागात अनेक प्रश्नावर सक्रिय झालेले दिसतात . युवकांमध्ये बच्चू कडू यांचं क्रेझ असून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी लक्ष घातल्याने त्यांचे युवकातील फॅन्स वाढणार आहेत .एमपीएससीच्या तयारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून युवक पुण्यात येतात . 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com