Bacchu Kadu Criticises CM and Vikhe Maharashtra | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

राधाकृष्ण- फडणवीसांचे प्रेम संपले की सरकारही संपेल : बच्चू कडू

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

राज्यातील सरकार व भारतीय जनता पक्ष काहीही दावा करीत असले तरीही ते अत्यंत अस्थिर सरकार आहे. केवळ विरोधकांच्या प्रेमावर ते टिकले आहे. हे प्रेम संपले की सरकार केव्हाही कोसळेल - बच्चू कडू

नाशिक : ''राज्यातील सरकार व भारतीय जनता पक्ष काहीही दावा करीत असले तरीही ते अत्यंत अस्थिर सरकार आहे. केवळ विरोधकांच्या प्रेमावर ते टिकले आहे. हे प्रेम संपले की सरकार केव्हाही कोसळेल,'' असा दावा प्रहार संघटनेचे आमदार बच्चु कडु यांनी केला आहे.

ते म्हणाले, ''शरद पवार साहेबांचे मोदी साहेबांवर आणि फडणवीसांचे राधाकृष्णावर प्रेम टिकुन आहे तोपर्यंतच राज्यातील सरकार टिकेल. हे प्रेम संपले की सरकारचे अस्तित्व संपलेच म्हणून समजा.'' आमदार कडू यांनी कोणतीच विकासकामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली ते म्हणाले, ''सरकारमध्ये विकासकामांची इच्छाशक्ती राहिलेली नाही. दिल्लीतून आदेश येतात तसे यांना डोलावे लागते. त्यामुळे विकास व सामान्यांच्या प्रश्नावर ते काहीच करु शकत नाहीत. सध्या नवी दिल्लीच्या इच्छेखातर बुलेट ट्रेनसाठी त्यांना तीस हजार कोटी राखीव ठेवावे लागणार आहेत. समृध्दी महामार्गासाठी दहा हजार कोटी ठेवावे लागतील. सातव्या वेतन आयोगासाठी व अन्य घोषित कामांसाठी चाळीस हजार कोटी रुपये लागतील.'' या स्थितीत राज्य सरकार लोकांची काय कामे करणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

संबंधित लेख