babanrav lonikar | Sarkarnama

बांधावर जाऊन सरकारी योजनांची माहिती द्या - लोणीकर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 मे 2017

परभणी : धारासूर येथे शुक्रवारी शिवार संवाद अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बबनराव लोणीकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

परभणी : केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अनेक कल्याणकारी योजना राबवीत आहे. शासनाच्या सर्व योजनांचा फायदा थेट शेतकऱ्यांना होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. 

धारासूर (ता. गंगाखेड) येथे शुक्रवारी शिवार संवाद अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष कदम, आनंद भिसे, बाबासाहेब फले, बाबासाहेब जामगे, विठ्ठलराव रबडे, बाबूराव पवार, रामप्रभू मुंडे, बंडू सोळुंके, मधुकर गव्हाणे, उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींची उपस्थिती होती. शासनामार्फत उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान राबविले जात असून शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून गावागावांत औजार बॅंकेची निर्मिती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांना समाविष्ट करून त्यांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरकारी योजनांची माहिती द्यावी, शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 

संबंधित लेख