babanrao lonikar and election | Sarkarnama

परभणी लोकसभेची जबाबदारी राहुल यशस्वीपणे सांभाळू शकतो : बबनराव लोणीकर

योगेश बरीदे
रविवार, 9 डिसेंबर 2018

परतूर : परतूर - मंठा विधानसभा मतदारसंघाचा सगळा चार्ज आपण राहुल याच्याकडे दिलाय. तोच खरा या मतदारसंघाचा पालकमंत्री आहे. म्हणूनच मी राज्यात निश्‍चिंतपणे फिरू शकतो. परतूर - मंठा विधानसभेप्रमाणेच आगामी लोकसभा निवडणूकीत तो परभणीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळू शकतो असे स्पष्ट करत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आपले चिरंजीव राहुल लोणीकर यांच्या परभणी लोकसभा उमेदवारीचे संकते दिले. 

सी.एम.चषक क्रीडा स्पर्धेचे उद्धाटन आज (ता.9) लोणीकर पिता-पुत्रांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी बबनराव लोणीकरांनी आपल्या चिरंजीवांचे तोंडभरून कौतुक केले. परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघात विकासकामे आणि त्यासाठी भरघोस निधी मिळावा यासाठी आपल्याकडे आग्रहच धरला होता. राहुल यांच्या पाठपुराव्यामुळेच आज मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकासकामे सुरू असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. 

सीएम चषक स्पर्धेचे संपूर्ण राज्यात आयोजन करण्यात आले आहे. विविध क्रिडा प्रकारांसाठी 43 हजारांहून अधिक खेळांडूची त्यासाठी नोंदणी झाल्याचा दावा करतांनाच परतूर- मंठी विधानसभा मतदारसंघाचा या आयोजनात राज्यात दुसरा क्रमांक असल्याचे सांगतानाच याचे सगळे श्रेय त्यांनी आपले चिरंजीव राहुल लोणीकर व त्यांच्या युवा टीमला दिले. 

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युती होण्याची शक्‍यता नसल्याचे बोलले जाते. या पार्श्‍वभूमीवर भाजपने मराठवाड्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशातील मंत्री डॉ. महेंद्र सिंग यांनी मराठवाड्यातील आठही मतदारसंघांमध्ये बैठका घेऊन उमेदवाराची चाचपणी काही महिन्यांपूर्वी केली होती. परभणी लोकसभा मतदारसंघातून बबनराव लोणीकर की त्यांचे चिरंजीव राहुल लोणीकर याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. लोणीकर पिता-पुत्रांनी या मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रीत करत तिकडे दौरे देखील वाढवले आहेत. 

बबनराव लोणीकर पुन्हा विधानसभा लढवण्यास इच्छूक असल्यामुळे ते परभणी लोकसभा मतदारसंघासाठी राहूल लोणीकर यांचे नाव पुढे करत असल्याचे समजते. राहुल परभणी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळू शकतो या त्यांच्या आजच्या विधानाने राहुल लोणीकर यांना पक्षश्रेष्ठी उमेदवारी देणार का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

संबंधित लेख