babanrao lonikar and bjp | Sarkarnama

नऊ महिन्यात लेकरु होते, योजना का नाही ? लोणीकरांची असभ्य भाषा...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

नांदेड : नऊ महिन्यात लेकरु होते, परंतु पाणी पुरवठ्याच्या योजना का पूर्ण होत नाहीत. अशा गेड्यांच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना कोपऱ्यात आणि ढोपरात म्हशीचे इंजेक्‍शन देऊ. मी परभणीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना वठणीवर आणले आहे. भाजप सरकारमध्ये नीट वागले नाही तर कारवाई करु, अशा शब्दात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शुक्रवारी ते जिल्ह्यातील दहा पाणी पुरवठा योजनांच्या ई भुमिपूजनानंतर आयोजीत केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. निधी उपलब्ध करुनही पाणी योजनेची कामे न पूर्ण न केल्याबद्दल मंत्रीमहोदयांनी अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले. ते म्हणाले की जिल्हा परिषदेचे अपूर्ण कामे दोन वर्षापासून रखडली आहेत. या सोबतच मुख्यमंत्री पेयजल योजना, जलस्वराज्य टप्पा दोन व राष्ट्रीय पेयजल योजनेचे कोटी रुपये जिल्ह्यात पडून असताना कामे का झाले नाहीत, असा सवाल करुन त्यांनी बैठकीत अनेकवेळा असभ्य भाषा वापरली. बैठकीला उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई जवळगावकर मध्येच निघून गेल्या. तर महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही मान खाली घालावी लागली. 

संबंधित लेख