babanrao gholap | Sarkarnama

आजचा वाढदिवस : बबनराव घोलप, माजी मंत्री.

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

देवळाली विधानसभा मतदारसंघातून बबन घोलप सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. या विजयात मतदारसंघातील सोशल इंजिनिअरिंगचा मोठा वाटा आहे. 1995 ते 1999 या कालावधीत राज्याचे समाजकल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. सामान्य कौटुंबिक स्थिती व कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसलेले घोलप शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आले. पराभव ही यशाची पहिली पायरी असते यानुसार 1985 मध्ये शिवसेनेचे उमेदवार असताना पुलोद आघाडीकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मात्र या मतदारसंघात सलग सत्तावीस वर्षे शिवसेनेचा दबदबा कायम असून 2014 मध्ये त्यांचे पुत्र योगेश घोलप येथून निवडून आले. वालदेवी धरण तसेच नाशिक तालुक्‍यातील द्राक्ष बागांना पाणी मिळावे म्हणून त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. राज्यातील चर्मकार समाजाचे संघटन केले. प्रारंभी मेळ्यांतून अभिनय केला आहे. अभिनयाची आवड असल्याने "नीलांबरी' या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली. विविध चित्रपटांतून त्यांनी अभिनय केला आहे. 

संबंधित लेख