तर शिवतारे यांना पुरंदरमध्ये फिरू देणार नाही : जाधवराव

तर शिवतारे यांना पुरंदरमध्ये फिरू देणार नाही : जाधवराव

सासवड : जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येत्या महिनाभरात पुरंदर तालुका पंचायत समितीची आमसभा घेतली नाही तर त्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा मनसेच्या शेतकरी आघाडीचे प्रमुख बाबाराजे जाधवराव यांनी दिला.

सासवड येथे आज जाधवराव यांनी मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले. त्यानिमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीच रणशिंग त्यांनी फुंकले. पुरंदरमध्ये जाधवराव यांची ताकद कमी झाल्याच्या विरोधकांचा आरोपाला उत्तर देत तालुक्यातील विविध प्रश्नांवर आगामी काळात कार्यरत राहत असल्याचे त्यांनी सांगितले. मी परदेशात असल्याची अफवा विरोधक पसरवत असल्याचा आरोप करून गेल्या दहा वर्षांत आपण देश सोडला नसल्याचे त्यांनी पासपोर्ट फडकावून सांगितले.

शिवतारे हे केवळ बोलबच्चनगिरी करीत असून, तालुक्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या सभेला ते उपस्थित राहत नाहीत. तालुक्याची आमसभा तीन वर्षे झालेलीच नाही. ती त्यांनी येत्या महिनाभरात न घेतल्यास त्यांना तालुक्यात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. अंजीर, सीताफळ व इतर फळ उत्पादक शेतकरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र त्यांच्यासाठी परिषदा घेतल्या जातात.  ठोस कोणी काही करत नाही. आता या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याची घोषणा जाधवराव यांनी या मेळाव्यात केली.

बारामतीकरांवर आम्ही भरभरून प्रेम केले. मात्र त्यांनी सापत्नपणाची वागणूक दिली, असा उल्लेख करत त्यांनी राष्ट्रवादीविषयी नाराजी व्यक्त केली. पुरंदरचे हक्काचे पाणी बारामतीला नेण्यात आले. त्याविषयी शिवतारे काही बोलले नाहीत. मात्र तालुक्यावरील अन्याय असाच सुरू राहीला तर बारामतीला जाणारी वाहिनी फोडली जाईल, असाही इशारा त्यांनी दिला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com