B.A. , B.SC.curriculum will remain ; rumors are false - Jawdekar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

' बीए', ' बीएससी' अभ्यासक्रम बंद होणार नाही - जावडेकर 

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 14 जून 2017

नवी दिल्ली:  ""विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) "बीए' व "बीएस्सी' अभ्यासक्रम रद्द करणार असल्याची चर्चा ही शुद्ध अफवा आहे,'' असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सकाळला सांगितले. अभ्यासक्रम बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव आपल्या मंत्रालयासमोर नाही असेही ते म्हणाले. 

""अभ्यासक्रम बंद करण्यात येणार असल्याच्या काहीही तथ्य नसल्याचे जावडेकर यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पात यूजीसी व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजे एआयसीटीई यांचे नियमन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कोणत्याही अभ्यासक्रमात कालानुरूप बदल करणे समजू शकतो पण म्हणून मात्र कोणतेही वर्तमान अभ्यासक्रम अचानक बंद करणे हा याचा अर्थ असू शकत नाही व तसा काही प्रस्तावही नाही,'' असे जावडेकर यांचे म्हणणे आहे.

संबंधित लेख