ayushman programme narendra modi | Sarkarnama

पंतप्रधानांकडून "आयुष्मान योजने'चा आढावा 

वृत्तसंस्था
रविवार, 5 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुष्मान भारत योजनेंतर्गत सुरू होणाऱ्या आरोग्य विमा कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. ही योजना स्वातंत्र्यदिनी सुरू होणार आहे.

या योजनेंतर्गत देशातील कोणत्याही सरकारी आणि खासगी रुग्णालयात कॅशलेस उपचार शक्‍य होणार आहे. या योजनुसार दहा कोटी कुटुंबांचा पाच लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा उतरवला जाणार आहे. 

या बैठकीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, निती आयोग आणि पंतप्रधान कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयुष्मान योजनेच्या तयारीची माहिती पंतप्रधानांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलला छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेंतर्गत पहिल्या आरोग्य केंद्राचे उद्‌घाटन केले होते.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील नागरिकांना आरोग्य विमा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा हेतू आहे. या योजनेची घोषणा 2018-19 च्या अर्थसंकल्पात केली होती. या विम्यांतर्गत जवळपास सर्वच गंभीर आजारांवरील उपचार केले जाणार आहेत. कुटुंबातील कोणताच घटक या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी कुटुंबाचा आकार आणि वयाचे कोणतेही बंधन घातलेले नाही.  
 
संबंधित लेख