ayodha hearing | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

अयोध्या सुनावणीचे जानेवारीत वेळापत्रक 

वृत्तसंस्था
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाबाबतची सुनावणी वेगळ्या खंडपीठापुढे घेतली जाणार असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे खंडपीठ सुनावणीचे वेळापत्रक निश्‍चित करणार आहे. 

नवी दिल्ली : रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाबाबतची सुनावणी वेगळ्या खंडपीठापुढे घेतली जाणार असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे खंडपीठ सुनावणीचे वेळापत्रक निश्‍चित करणार आहे. 

अयोध्येतील जमीन वादावाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी वेगळ्या खंडपीठापुढे घेतली जाईल, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने आज स्पष्ट केले. अयोध्येतील वादग्रस्त 2.77 एकरची जागा सुन्नी वक्‍फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला या तिघांमध्ये समान वाटण्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. त्याविरोधात एकूण 14 याचिका दाखल झाल्या आहेत. 

संबंधित लेख