avinash dolas and aurangabad | Sarkarnama

भारिप बहुजन महासंघाचे नेते अविनाश डोळस यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : भारिप बहुजन महासंघाचे नेते व ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे विश्‍वासू सहकारी, आंबेडकरी चळवळीतील नेते, साहित्यिक आणि विचारवंत प्रा. अविनाश डोळस (वय 67) यांचे रविवारी पहाटे सहा वाजता हदयविकाराच्या धक्‍क्‍याने दुःखद निधन झाले. नाशिक जिल्ह्यातील आंबेदिंडोरी, ता. दिंडोरी हे त्यांचे मुळ गांव. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1950 रोजी झाला. विद्यार्थी दशेपासून आंबेडकरी चळवळीत ते सक्रीय होते. 15 फेब्रुवारी 1993 मध्ये ऍड. प्रकाश आंबेडकरांनी काही मोजक्‍या सहकाऱ्यांना सोबत घेऊन भारिपची स्थापना केली, त्यात प्रा. अविनाश डोळस यांचा सहभाग होता. 

1996 च्या लोकसभा निवडणुकीत भारिपकडून त्यांनी औरंगाबादमधून निवडणूक लढवत 93 हजार मते मिळवली होती. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची मोट बांधण्यात देखील प्रा. अविनाश डोळस यांची महत्वाची भूमिका होती. राज्य सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव असलेले प्रा. अविनाश डोळस मिलिंद महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख होते. नामांतर आंदोलन आणि मराठवाडा युवक चळवळीत सक्रिय असतांनाच दलित, बहुजनांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी आवाज उठवला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य मराठीमध्ये भाषांतरित करण्याला देखील त्यांनी आपल्या कार्यकाळात प्राधान्य दिले. 

नाट्य संमेलनाचे अध्यक्ष 
जानेवारी 1990 मध्ये नांदेड येथे भरलेल्या पाचव्या अखिल भारतीय दलित नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. जानेवारी 2011 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील बाराव्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. दलित, कष्टकरी, बहुजनांसाठी लेखनी चालवणारे प्रा. अविनाश डोळस हे प्रसिद्ध नाट्यलेखक होते. महासंगर (कथासंग्रह), सम्यक दृष्टीतून, आंबेडकरी चळवळ : परिवर्तनाचे संदर्भ, आंबेडकरी विचार आणि साहित्य ही त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित झालेली आहे. 
सायंकाळी सहा वाजता प्रा. अविनाश डोळस यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

संबंधित लेख