AVHALVADI GRAMPANCHAT RESULT | Sarkarnama

आव्हाळवाडीच्या सरपंचपदी ललिता आव्हाळे

नीलेश कांकरिया
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

वाघोली : आव्हाळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत खंडोबा ग्रामविकास पॅनलने नऊ जागा जिंकून बाजी मारली असली तरी सरपंचपद त्यांना थोडक्यात गमवावे लागले. प्रगती सहकार पॅनलच्या ललिता चंद्रकांत आव्हाळे या सरपंचपदी विजयी झाल्या. प्रगती पॅनलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. तर दोन अपक्षांनीही बाजी मारली.

वाघोली : आव्हाळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत खंडोबा ग्रामविकास पॅनलने नऊ जागा जिंकून बाजी मारली असली तरी सरपंचपद त्यांना थोडक्यात गमवावे लागले. प्रगती सहकार पॅनलच्या ललिता चंद्रकांत आव्हाळे या सरपंचपदी विजयी झाल्या. प्रगती पॅनलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. तर दोन अपक्षांनीही बाजी मारली.

तीन हजार 959 मतदार संख्या असलेल्या आव्हाळवाडीत सरपंचपदासह 14 जागेसाठी निवडणुक झाली. प्रगती सहकार पॅनलच्या ललिता चंद्रकांत आव्हाळे यांनी 1665 मते मिळवुन खंडोबा पॅनेलच्या अर्चना सुनील आव्हाळे यांच्यावर केवळ 14 मतानी मात केली. तर वाॅर्ड पाचमधील निवडणूक अतिशय चुरशीची झाली. यामध्ये शरद मारुती आव्हाळे यांनी 48 मतानी प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली.

तर अतुल मारुती शिंदे यांनी 415 मते मिळवुन विजय मिळविला. अपक्ष उमेदवार काकासाहेब रामराव सातव व उषा सुनिल सातव यांनी बाजी मारली. सरपंचपदाच्या अऩ्य उमेदवार स्वाती अनिल आव्हाळे यांना केवळ 11, अनुष्का गणेश सातव यांना 44 तर व रंजना सुरेश सातव यांना 61 मते मिळाली. नेाटाच्या बाजुने 11 मते पडली. 

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात प्रगती सहकार पॅनल -- 1) ललिता चंद्रकांत आव्हाळे ( सरपंचपदाच्या विजयी - 1665) २) अतुल मारुती शिंदे ( 415 ) 3) शरद मारुती आव्हाळे (405 ) 

खंडोबा ग्रामविकास पॅनल -- 1) पिराजी निवृत्ती आव्हाळे ( 399 )2) सुरेखा दादासेा सातव ( 395 ) 3) अलका बाळासाहेब सातव (429 ) 4) काकासाहेब रामराव सातव ( 267 ) 5) उषा सुनिल सातव ( 325 ) 6) देविदास भिकेाबा आव्हाळे ( 461 ) 7) अश्वीनी संदीप आव्हाळे ( 528 )8) राजकन्या सागर आव्हाळे ( 522 ) 
9) विक्रम वसंत कुटे ( 426 )10) अनिता दत्तात्रय आव्हाळे ( 404 ) 11) मंदा अशेाक सातव ( 557 ) 

 सरपंचपद थेाडक्यात हुकले

खंडोबा ग्रामविकास पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार अर्चना सुनील आव्हाळे यांना 1651 मते मिळाली. त्यांचा केवळ 14 मतांनी पराभव झाला. याच पॅनलने 9 जागा मिळवुन वर्चस्व राखले. मात्र त्यांना सरपंचपदाला थोडक्यात मुकावे लागले. सरपंचपद त्यांच्या हाती आले असते तर प्रगती सहकार पॅनलचा धुव्वा झाला असता. निवडुन आलेल्या प्रगती सहकार पॅनलच्या ललिता आव्हाळे यांना जनतेतुन निवडून आल्याचा पहील्या क्रमांकाचा मान मिळाला आहे. त्या आव्हाळवाडीच्या 20 व्या सरपंच असणार आहेत. 

संबंधित लेख