avadhut tatkare will joined shivsena in dasara melava | Sarkarnama

अवधुत तटकरेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन प्रवेशासाठी शिवसेना आग्रही 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या घराण्यात अखेर राजकीय फुट पडण्याचे स्पष्ट झाले असून माजी आमदार अनिल तटकरे दोन्ही मुलांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

आमदार अवधुत तटकरे यांनीही राष्ट्रवादीचा राजीनामा देवून प्रवेश करावा यासाठी शिवसेनेनं आग्रह धरला आहे. एक वर्षे अगोदरच आमदारकीचा राजीनामा देण्यास अवधुत यांची तुर्तास तयारी नसल्याचे समजते. 

दसरा मेळाव्यात हा प्रवेश सोहळा होण्याचे संकेत आहेत. अनिल तटकरे हे सुनील यांचे थोरले बंधु आहेत. विधानपरिषदेवर ते राष्ट्रवादीच्या कडून आमदार देखील होते. त्यांचे पुत्र अवधुत तटकरे हे सध्या राष्ट्रवादीचे विधानसभा सदस्य आहेत. तर, संदिप तटकरे यांनी रोहा नगरपरिषदेत पक्षाची बंड करून शिवसेनेच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष निवडणूक लढविली होती. 

राजकीय महत्वकांक्षेपोटी तटकरे कुटूंबियात वाद सुरू होता. एकाच घरातील कित्येक जणांना आमदारकी द्यावी यावरून पक्षात देखील संभ्रम होता. तरीही तटकरे यांच्यासह अनिल व अवधुत यांना पक्षांने संधी दिली होती. मात्र, सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती जिल्हा परिषद अध्यक्षा झाल्या. तर पुत्र अनिकेत विधानपरिषद सदस्य झाले आहेत. त्यामुळे, भाऊबंदकीतली राजकिय स्पर्धा आता टोकाला गेल्याने अनिल तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, आमदार अवधुत तटकरे यांनीही राष्ट्रवादीचा राजीनामा देवून प्रवेश करावा यासाठी शिवसेनेनं आग्रह धरला आहे. पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्यांना राजीनामा दिल्याशिवाय प्रवेश करता येणार नाही. मात्र, भाजप खासदार नाना पटोले व आमदार आशिष देशमुख यांनी ज्या प्रकारे राजीनामे दिले त्याच धर्तीवर अवधुत तटकरे यांनीही राजीनामा देवून पक्षप्रवेश करावा असे शिवसेना नेत्यांचे मत आहे. तर, एक वर्षे अगोदरच आमदारकीचा राजीनामा देण्यास अवधुत यांची तुर्तास तयारी नसल्याचे समजते. 

संबंधित लेख