aurangabad zp | Sarkarnama

औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना-कॉंग्रेसला प्रत्येकी दोन सभापती

सरकारनामा न्यूज ब्युरो 
सोमवार, 3 एप्रिल 2017

औरंगाबाद ः जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युला कायम ठेवत सोमवारी झालेल्या विषय समिती सभापती निवडणुकीत शिवसेना व कॉंग्रेसला प्रत्येकी दोन सभापती पद मिळाली. शिवसेनेकडून लोहकरे कुसुमबाई कारभारी व विलास भुमरे यांना सभापती पद देण्यात आले. तर कॉंग्रेसकडून धनराज बेडवाल व मीना शेळके यांची निवड करण्यात आली. त्यांना प्रत्येकी 34 मते मिळाली. 

महिला व बाल कल्याण समिती सभापतिपद शिवसेना तर समाज कल्याण कॉंग्रेसच्या वाट्याला गेल्याने आता बांधकाम व अर्थ समिती सभापतिपद शिवसेनेचे विलास भुमरे यांच्याकडे जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. कॉंग्रेसच्या मीना शेळके यांच्याकडे शिक्षण व आरोग्य समिती सभापतिपदाचा पदभार दिला जाऊ शकतो. या दोन्ही विषय समित्यांचे वाटप विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्षांच्या उपस्थितीत 20 एप्रिल पर्यंत करावे लागणार आहे. या शिवाय विषय समिती सदस्य, स्थायी समिती सदस्यांची सुद्धा नियुक्ती याच वेळी केली जाणार आहे. 

अखेर पैठणला न्याय मिळाला 
पैठण तालुक्‍यातून सर्वाधिक सदस्य निवडून आणल्याचे सांगत आमदार संदीपान भुमरे यांनी थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा केला होता. तसेच मागणीचा विचार न झाल्यास भाजपसोबत जाण्याचा इशारा दिल्याची चर्चा त्यावेळी शिवसेनेत होती. मात्र वरिष्ठांनी समजूत काढून भुमरे यांना त्यावेळी शांत केले होते. पण त्या बदल्यात भुमरे यांचे पुत्र विलास यांना सभापती पद देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. आज विलास भुमरे यांची निवड झाल्याने पैठणला न्याय मिळाल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करत होते. 

संबंधित लेख