aurangabad zp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसताच रस्त्याची मागणी 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 22 मार्च 2017

विशेष म्हणजे डोणगांवकर यांची निवड जाहीर होण्याआधीच या ग्रहस्थानी त्यांच्या नावानिशी निवेदन टाइप करून आणले होते. सत्तेचा विजयोत्सव साजरा होत असतानाच पहिल्याच दिवशी अध्यक्षांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव ग्रामस्थाने करून दिल्याचे कौतुक जिल्हा परिषदेत अनेकजण करत होते. 

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी घोषणा होऊन देवयानी डोणगांवकर या खुर्चीवर विराजमान होताच वैजापूर तालुक्‍यातील वाकला गावच्या एका ग्रामस्थाने त्यांच्याकडे रस्त्याची मागणी करणारे निवदेन सादर केले. कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेने अध्यक्षपद पटकावल्याचा आनंद आणि जल्लोष सुरु असतानाच
रस्त्याच्या मागणीचे निवदेन आल्याने अध्यक्षांना लोकांनी आतापासूनच कामाला लावल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली. 

अध्यक्षपदाची निवडणूक, ऐनवेळी चमत्कार होतो का? कॉंग्रेसचे सदस्य फुटणार की शिवसेनेचाच अध्यक्ष होणार असे तणावाचे वातावरण दुपारी जिल्हा परिषदेत होते. पोलिस बंदोबस्त कार्यकर्त्यांच्या गराड्यात सुरक्षितपणे सभागृहापर्यंत पोचलेले सदस्य, त्यातच पोलिस आणि शिवसैनिकामध्ये झालेल्या वादावादीमुळे माहोल अधिकच
गरम झालेला. अखेर मतदान पार पडले. ढोल-ताशे, घोषणाबाजी, गुलालाची उधळण आणि पेढे भरवत एकमेकांचे अभिनंदन असे उत्साहाचे वातावरण. अध्यक्षांना लालदिव्याच्या गाडीत व अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवण्याची कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. एकीकडे नूतन अध्यक्ष हार, तुरे आणि अभिनंदनाचा स्वीकार करत होत्या.

एवढ्या घाईगर्दीतून मार्ग काढत साधरणता 60 ते 65 वर्षांचे काका हातात निवदेन घेऊन अध्यक्षांच्या दालनात प्रवेश करते झाले. वैजापूर तालुक्‍यातील वाकला
ते-कासारी, गोंडेगाव, ढेकू आणि तलवाडा या 21 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करा अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी नव्या अध्यक्षांना दिले. 

 

संबंधित लेख