Aurangabad VHP Hunkar Sabha | Sarkarnama

हिंदुत्ववादी सरकार असतांना नुसत्या घोषणा नको- भास्करगिरी महाराज 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 3 डिसेंबर 2018

विश्‍व हिंदू परिषदेच्या हुंकार सभेसाठी संत-महंताना आमंत्रित करण्यात आले होते. आर्शिवचनपर मार्गदर्शनात देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांनी शहरांची नावे बदलण्याच्या घोषणांवरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच सुनावले. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याची मागणी केली जात असल्याचा उल्लेख करतांना उद्याच महापालिकेत ठराव आणा, आपल्या मतांच्या जीवावर सशक्त झालेल्या पुढाऱ्यांचे मनगट पकडून त्यांना काम सांगा असे आवाहन उपस्थितांना केले. 

औरंगाबाद : ''अयोध्येत राम मंदिर बांधायची घोषणा, औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि अहमदनगरचे अंबिकानगर करायचेय. मग राज्यात, केंद्रात आणि महापालिकेतही तुमची सत्ता असतांना नुसत्या घोषणा कसल्या करता, नेमक पाणी कुठं मुरतंय," असा खडा सवाल देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांनी औरंगाबादेतील विश्‍व हिंदू परिषदेच्या हुंकार सभेत केला. 

विश्‍व हिंदू परिषदेच्या हुंकार सभेसाठी संत-महंताना आमंत्रित करण्यात आले होते. आर्शिवचनपर मार्गदर्शनात देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांनी शहरांची नावे बदलण्याच्या घोषणांवरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच सुनावले. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याची मागणी केली जात असल्याचा उल्लेख करतांना उद्याच महापालिकेत ठराव आणा, आपल्या मतांच्या जीवावर सशक्त झालेल्या पुढाऱ्यांचे मनगट पकडून त्यांना काम सांगा असे आवाहन उपस्थितांना केले. 

विश्‍व हिंदू परिषदेने हिंदुत्वाची अब्रू सांभाळण्याचे काम केले, दिवंगत अशोक सिंघल यांनी देशभरातील साधू-संताना एकत्र आणले. पण दुर्दैवाने त्यांना आयोध्येत राम मंदिर पाहता आले नाही.त्यांचे अपुर्ण राहिलेले स्वप्न तुम्हाला पुर्ण करायचे आहे असे सांगतानाच, आयोध्येत बाबरी मशीद पाडली असा उल्लेख यापुढे करू नका, कारण तिथे मशीद नव्हतीच, तर तिथे असलेलं जुन राम मंदिरच जिर्णोधारासाठी पाडले, आणि आता भव्य राम मंदिर उभारले जाईल, असा विश्‍वास भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केला. 

हा लढा रामासाठी, कुणाच्या धर्माच्या विरोधात नाही असे स्पष्ट करतांनाच, राम मंदिर बांधल्याने गरीबाच्या पोटा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे का? या टिकेचा समाचार देखील त्यांनी घेतला. हा पोट भरण्याचा प्रश्‍न नाही, तर श्रध्देचा प्रश्‍न आहे, एकदा राम मंदिर बांधून तर पहा. त्यासाठी तीन लाख राम भक्तांनी बलिदान दिले आहे, त्यामुळे सत्ता कुणाचीही असो राम सगळ्यांचाच आहे असे ते म्हणाले. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याचा उल्लेख करतांना, राम मंदिराच्या निर्माणासाठी त्यांची देखील मदतच होईल, रामासाठी जो जो झटेल तो रामाचा आणि त्यामुळे राम मंदिरासाठी निवडणुकीची वाट पाहू नका असे आवाहन देखील भास्करगिरी महाराजांनी केले. 

राम मंदिरासाठी गोळ्या झेलू- नवनाथ आंधळे
अयोध्येमध्ये 1992 मध्ये जेव्हा करसेवा झाली तेव्हा त्यात तीन लाखाहून अधिक रामभक्तांनी बलिदान दिले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. राम मंदिरासाठी देशभराती साधू-संत छातीवर गोळ्या झेलायला तयार आहेत, पण आता राम मंदिर झालेच पाहिजे असे आवाहन नवनाथ महाराज आंधळे यांनी आपल्या भाषणात केले. 

मोदी भगवंताचा अवतार- शांतिगिरी महाराज
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भंगवाताचा अवतार आहेत. त्यांच्या सारखे नेतृत्व आपल्याला लाभले हे आपले भाग्यच आहे. तेव्हा येणाऱ्या लोकसभा निवडणुकी आधीच आयोध्येत राम मंदिर उभारले जावे अशी इच्छा वेरूळ मठाचे मठाधिपती शांतिगिरी महाराज यांनी व्यक्त केली. लवकरच आयोध्येत राम मंदिर निर्माणाचे काम सुरू करण्याची बुध्दी सत्ताधाऱ्यांना मिळो अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख