विमानसेवा बंद पडल्याने औरंगाबादचा पर्यटन व्यवसाय ठप्प- इम्तियाज जलील 

''जगप्रसिध्द अजिंठा, वेरूळ लेण्या असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय विमानसेवे अभावी ठप्प झाला आहे. शहरातील हॉटेल ओस पडली आहेत. जगभरातील पर्यटकांना या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची इच्छा असली तरी विमान वाहतूकसेवा विस्कळीत झाल्यामुळे ते येऊ शकत नाहीत. केवळ पर्यटनच नाही तर औद्योगिक विकासावर देखील याचा विपरित परिणाम होत आहे," असा मुद्दा खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत उपस्थित केला.
विमानसेवा बंद पडल्याने औरंगाबादचा पर्यटन व्यवसाय ठप्प- इम्तियाज जलील 

औरंगाबाद : ''जगप्रसिध्द अजिंठा, वेरूळ लेण्या असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय विमानसेवे अभावी ठप्प झाला आहे. शहरातील हॉटेल ओस पडली आहेत. जगभरातील पर्यटकांना या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची इच्छा असली तरी विमान वाहतूकसेवा विस्कळीत झाल्यामुळे ते येऊ शकत नाहीत. केवळ पर्यटनच नाही तर औद्योगिक विकासावर देखील याचा विपरित परिणाम होत आहे," असा मुद्दा खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत उपस्थित केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संसदेतील भाषणात पर्यटनाला चालना देणार असल्याचे सांगितले आहे. याची सुरूवात औरंगाबादमध्ये मुंबई, दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करून करावी अशी मागणी देखील इम्तियाज यांनी सभागृहात केली.  जेट एअरवेजची सेवा देशभरात बंद झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादला बसला आहे. औरंगाबादहून दिल्ली आणि मुंबईला जाणारी दोन विमाने रद्द झाल्यामुळे जगभरातून येणाऱ्या पर्यटक तसेच उद्योजकांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचा परिणाम पर्यटन व उद्योग व्यवसायवर होत आहे. औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रश्‍नावर सभागृहाचे लक्ष वेधले. 

इम्तियाज जलील म्हणाले, ''जगातील दोन महत्वाची ऐतिहासिक पर्यटनस्थळ शंभर किलोमीटरच्या आत असलेले औरंगाबाद हे औद्योगिक शहर म्हणून देखील ओळखले जाते. कधीकाळी औरंगाबाद उदयपूर-जयपूर-दिल्लीला जोडणारी विमानसेवा शहरातून सुरू होती. त्यामुळे जगभरातील पर्यटक इथे यायचे. अजिंठा, वेरूळ लेण्यांसह शहरातील विविध पर्यटन स्थळांनी भेटी देऊन मुक्काम करायचे. पण कालांतराने ही सेवा बंद झाली आणि पर्यटन व्यवसायाला घरघर लागली. जेट एअरवेजची सेवा बंद झाल्याचा सर्वाधिक तोटा माझ्या मतदारसंघाला झाला आहे. बेरोजगारीचे प्रमाण तर वाढलेच, पण पर्यटन व्यवसाय व उद्योग देखील संकटात आले आहेत. विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात मी नागरी उड्डयण मंत्री, सचिव यांची प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना निवेदन देखील दिले आहे.''

ते पुढे म्हणाले, "औरंगाबादच्या पर्यनट वृध्दीसाठी विमानसेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे हे निदर्शनास आणून दिले. परंतु जेट एअरवेज बंद झाल्यामुळे अनेक पायलट दुसऱ्या विमान कंपन्यांमध्ये रुजू झाल्यामुळे नवी विमानसेवा सुरू करण्यात अडचणी असल्याचे मला सांगण्यात आले.  मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. औंरगाबाद वगळता इतर जिल्ह्यांमध्ये उद्योगांचे प्रमाण नगण्य आहे.'' अशावेळी पर्यनट व्यवसाय व उद्योगांचे महत्व लक्षात घेऊन नागरी विमान वाहतूक विभागाने तातडीने खाजगी किंवा एअर इंडियाच्या दिल्ली-मुंबई विमानसेवा सुरू कराव्यात, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी सभागृहात केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com