aurangabad-raosaheb-danve-shivsena | Sarkarnama

राममंदिर नव्हे, विकास आमचा मुद्दा : रावसाहेब दानवे 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने देशभरात रान पेटवले आहे. सगळीकडे शिवसेना आणि राममंदिर असे चित्र निर्माण झाले आहे. राममंदीर हा भाजपचा मुद्दा आहे, शिवसनेने आमचा मुद्दा हायजॅक करू शकत नाही, असे भाजपचे नेते सांगत सुटले आहे. आगामी निवडणुकीत केवळ राममंदीर या एकाच मुद्दयावर भाजप विसंबून राहणार नाही, विकास हाच भाजपचा निवडणुकीतला मुद्दा राहणार असल्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. 

औरंगाबाद: राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने देशभरात रान पेटवले आहे. सगळीकडे शिवसेना आणि राममंदिर असे चित्र निर्माण झाले आहे. राममंदीर हा भाजपचा मुद्दा आहे, शिवसनेने आमचा मुद्दा हायजॅक करू शकत नाही, असे भाजपचे नेते सांगत सुटले आहे. आगामी निवडणुकीत केवळ राममंदीर या एकाच मुद्दयावर भाजप विसंबून राहणार नाही, विकास हाच भाजपचा निवडणुकीतला मुद्दा राहणार असल्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. 

चार वर्षांपासून राज्यात एकमेकांच्या साथीने सत्ता चालविणाऱ्या भाजप आणि शिवसेनेत वेगवेगळ्या मुद्यावर कुरघोड्या सुरु आहे. यातच आयोध्यातील राममंदरीचा मुद्दा आवाज उठठवत शिवसेनेने भाजपच्या मुख्य मुद्यालाच हात घातला आहे. मात्र हा मुद्दा भाजपचा आहे. अनेक वर्षापासून तो मुद्दा हाती घेतला आहेत. यामूळे राममंदीर हेवळ भाजप आणि शिवसेनेचा इच्छा नाही, तर देशाच्या आम जनेतची इच्छा आहे. आम्ही ज्या-ज्या वेळी हा मुद्दा हाती घेतला तेव्हा शिवसेना आमच्या सोबत होती. 

आता शिवसेनेने हा मुद्दा हाती घेत आयोध्यात जाऊन साधू-संताची आर्शिवाद घेत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याने भाजप त्यांचे स्वागत करतो. केवळ शिवसेना भाजपच नाही तर जो जो- पक्ष या मुद्दाला साथ देईल. त्याचं भलचं होणार आहे. यामूळे सर्व पक्षांनी एकत्र येत राममंदीराचा मुद्दा सोडवावा, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज औरंगाबादेत सांगितले. 

भगवान शिवसेनेला सद्बुद्धी देईन अन्‌ चर्चा होईल.... 
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप-शिवसेन यांच्यात युतीविषयी आम्ही सकारात्मक आहे. समविचारी पक्षानं एकत्र यावं असे आमची इच्छा आहे. मत विभाजन टाळत कॉंग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होऊ नये, असा आमचा पहिल्यापासूनच प्रयत्न आहे. रामाच्या दर्शनाहून आल्यानंतर भगवान शिवसेना सदबुद्धी देईल आणि आम्ही पुन्हा युतीसाठी चर्चेला बसू असा विश्‍वसही यावेही रावसाहेब दावने यांनी व्यक्‍त केला. 

घटनात्मक दुरुस्तीनंतर सुटेल राममंदीराचा प्रश्‍न 
भाजपने राममंदीराचा मुद्दा सोडला नाही. राममंदिराचा मुद्दा हा आमचा पहिल्यापासूनचा मुद्दा आहे. आगामी निवडणुकीसाठी राममंदीराबरोबर विकास हा आमचा मुद्दा राहील. देशातील अनेक प्रश्‍न आमच्या पक्षाने सोडले आहे. यामूळे आमचा मुद्दा कोणी हायजॅक करू शकत नाही.
 
राममंदीराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकसभेत आमची सिंपल मॅजॉरिटी आहे. टू थर्ड मॅजॉरिटी असल्याशिवाय, घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय शिवाय अशा प्रकाराचा कायदा आम्हाला करता येत नाही. लोकसभेत जरी सिंपल मॅजॉरिटीमध्ये कायदा केला, तरी राज्यसभेत आमचे बहुमत नाही, मात्र 2019नंतर आमची टू थर्ड मॅजॉरिटी येईल, असे ही दानवे यांनी सांगितले.

संबंधित लेख