aurangabad problem in maratha kranti morcha | Sarkarnama

औरंगाबादमध्ये आंदोलन हिंसक, दगडफेक, पोलिसांची गाडी फेटवली

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : वाळुंज औद्योगिक वसाहतीत असलेल्या शिवम इंडस्ट्रीजवर सुमारे शंभर जणांनी दगडफेक करत लाखोंचे नुकसान केले आहे. मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला आज औरंगबादमध्ये हिंसक वळण लागले. जमावाने एक पोलिस गाडी पेटवली तसेच दोन खासगी गाड्यांचे प्रचंड नुकसान केले. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुरांच्या नळकांडयांचा वापर करावा लागला तसेच लाठीमारही करावा लागला. 

वाळुंज औद्योगिक वसाहतीच्या इ सेक्‍टरमध्ये असलेल्या शिवम इंडस्ट्रीजवर सुमारे शंभर जणांनी दगडफेक केली. गुरुवारी (ता. नऊ) सकाळी अकराला 'महाराष्ट्र बंद' मध्ये सहभागी झालेल्या शिवम इंडस्ट्रीज या कंपनीत दोन सुरक्षा रक्षक होते. त्यांच्या उपस्थितीत ही दगडफरक झाली असून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती कंपनीचे संचालक के. डी. शार्दूल यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख