Aurangabad Politics over VandeMataram | Sarkarnama

औरंगाबादच्या महापौरांना वंदेमातरम संघटनेचे पत्र

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची सुरुवात वंदेमातरम्् गीताने झाली. महापालिकेतील सर्वच पक्षांचे नगरसेवक अधिकारी, कर्मचारी यावेळी उभे राहिले. परंतु एमआयएमचे सय्यद मतीन व काँग्रेसचे नगरसेवक सोहेल शेख हे जागेवर बसून राहिले. वंदेमातरम्् गीत झाल्यानंतर शिवसेना, भाजपसह इतर पक्षांनी यावर जोरदार आक्षेप घेत या दोन्ही नगरसेवकांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. त्यामुळे महापालिका सभागृहाला आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

औरंगाबाद : शनिवारी (ता. 19) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदेमातरम्् गीताचा अवमान करत उभे न राहणाऱ्या एमआयएम व काँग्रेसच्या नगरसेवकांवर कारवाई करा अशी मागणी करणारे पत्र पुण्याच्या वंदेमातरम्् संघटनेने महापौर भगवान घडामोडे यांना दिले. संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नरवडे व इतर पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी महापौरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची सुरुवात वंदेमातरम्् गीताने झाली. महापालिकेतील सर्वच पक्षांचे नगरसेवक अधिकारी, कर्मचारी यावेळी उभे राहिले. परंतु एमआयएमचे सय्यद मतीन व काँग्रेसचे नगरसेवक सोहेल शेख हे जागेवर बसून राहिले. वंदेमातरम्् गीत झाल्यानंतर शिवसेना, भाजपसह इतर पक्षांनी यावर जोरदार आक्षेप घेत या दोन्ही नगरसेवकांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. त्यामुळे महापालिका सभागृहाला आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

निलंबित भ्रष्ट अधिकाऱ्यांना रुजू करून घेतल्यामुळे या विषयावर चर्चाच होऊ नये यासाठी वंदेमातरम््चा वाद उकरून सभा बंद पाडण्यात आल्याचा आरोप देखील सत्ताधारी भाजपवर करण्यात आला होता. यामागे राजकारण असले तरी या प्रकारात वंदेमातरम््चा मात्र अवमान झाला. या प्रकाराची दखल घेत पुणे येथील वंदेमातरम्् संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नरवडे, उपाध्यक्ष सुरेश जाधव, विनोद मोहिते, आकाश गजमल व दीपक देशमुख या पदाधिकाऱ्यांनी महापौर भगवान घडामोडे यांची भेट घेऊन त्यांना निवदेन दिले.

देशाचा अवमान करणारी घटना
वंदेमातरम् सुरु असतांना उभे न राहणाऱ्या काँग्रेस व एमआयएमच्या नगरसेवकांचा वंदेमातरम्संघटनेच्या वतीने महापौरांकडे निषेध व्यक्त केला. या देशात, मातृभूमीत राहून या सदस्यांनी वंदेमातरम््चा अपमान केला आहे. अशा प्रवृत्तीमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे अशा नगरसेवकांवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात पुन्हा वंदेमातरम् गीताचा अवमान होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने महापौरांकडे करण्यात आली.

संबंधित लेख