Aurangabad police fire bullets in air to disperse unruly mob | Sarkarnama

औरंगाबाद : मिटमिटा ग्रामस्थांच्या दगडफेकीत १२  पोलीस जखमी ;पोलीसांचा हवेत गोळीबार

जगदीश पानसरे :सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 मार्च 2018

जमाव आक्रमक होऊन दगडफेक करत असल्याने पोलीसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला. त्यामुळे भडकलेल्या जमावाने पोलीसांवरच दगडफेक करण्यास सुरूवात केल्याने वातावरण चिघळले. दगडफेकीत 12 पोलीस जखमी झाल्याचे कळते. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत हवेत गोळीबारही केल्याचे कळते. 

औरंगाबाद   : कचरा प्रश्‍नावरून मिटमिटा येथे आज (ता. 7) पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये धुमश्‍चक्री झाली. पोलीस बंदोबस्तात मिटमिट्याकडे आलेल्या कचऱ्याच्या ट्रक रोखण्यासाठी गावकऱ्यांनी दगडफेक केली. जमाव आक्रमक होऊन दगडफेक करत असल्याने पोलीसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला.

त्यामुळे भडकलेल्या जमावाने पोलीसांवरच दगडफेक करण्यास सुरूवात केल्याने वातावरण चिघळले. दगडफेकीत 12 पोलीस जखमी झाल्याचे कळते. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत हवेत गोळीबारही केल्याचे कळते. 

कचरा प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी आज महापालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. इकडे सभा सुरू असतांनाच कचरा घेऊन मिटमिटा येथे निघालेल्या गाड्या ग्रामस्थांनी अडवत त्या जाळण्याचा प्रयत्न केला. कचरा गाड्यांसोबत पोलीस बंदोबस्त असल्याने पोलीसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी पोलीसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. 

आक्रमक झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीसांनी लाठीचार्ज केला, त्यामुळे जमाव अधिकच भडकला आणि त्यांनी पोलीस व त्यांच्या वाहनांना लक्ष करत तुफान दगडफेक केली. यात पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंदोलकांना रोखणे अवघड जात असल्याने पोलीसांनी आधी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि त्यानंतर हवेत गोळीबार केल्याची माहिती आहे. 

आंदोलकांकडून वाहनांची मोडतोड आणि प्रचंड दगडफेक सुरू असल्याने यात आतापर्यंत 12 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकारामुळे औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून हिंसक आंदोलकांना रोखण्यासाठी 800 पोलीसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे कळते.

संबंधित लेख