केलेली कामे लोकांपर्यंत पोहचविण्यात कमी पडलो - कैलास पाटील

केलेली कामे लोकांपर्यंत पोहचविण्यात कमी पडलो - कैलास पाटील

औरंगाबाद : " महिला आरक्षण, शंभर टक्‍के फळबागा योजना, शिक्षण क्षेत्रातील काम, घरकूल योजनासह अनेक विविध योजना शरद पवार आणि छगन भुजबळाच्या काळात लागू झाल्या. एवढे नाही तर ओबीसी आरक्षणाची घोषणाही पवारांनी केली होती. आरक्षण लागू झाल्यापासून आतापर्यंत अनेक कामे झाली, मात्र या कामाचा प्रचार करण्यात आम्ही कमी पडलो अशी खंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील यांनी पक्षाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात व्यक्त केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी कैलास पाटील तर कार्याध्यक्षपदी अभय पाटील यांची निवड झाली. पक्षातर्फे राष्ट्रवादी भवन येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मावळते जिल्हाध्यक्ष आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे कैलास पाटील यांच्याकडे सोपविली. जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच कैलास पाटील यांनी भविष्यात आपण कशा पध्दतीने काम करणार याची झलक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दाखवून दिली. आतापर्यतच्या जिल्हाध्यक्षांनी अनेक कामे केली. 2014 मध्ये नरेंद्र मोदीची हवा होती. त्यामुळे कामे करूनही लोकांनी वेगळा विचार केला. पण गेल्या चार वर्षात सत्ताधाऱ्यांनी सर्व घटकांची निराशा केली आहे. 

लोक या सरकावर नाराज आहेत, तेव्हा सर्वांनी मतभेद बाजूला सारून आगामी निवडणूकीसाठी एकत्र यावे असे आवाहन देखील पाटील यांनी केले. पक्षाचे राज्य उपाध्यक्ष कदरी मौलांना यांनी आपल्या भाषणातून अतंर्गत गटबाजीचा विषय चव्हाट्यावर आणला. त्याला देखील कैलास पाटील यांनी गटबाजी ऐवजी बाजी मारून दाखवा अशा शब्दांत पदाधिकाऱ्यांना कानपिचक्‍या दिल्या. 

 इतरांना मदत करणाऱ्यांना जागा दाखवू - चिकटगांवकर 
काही लोक पक्षात राहून शिवसेना-भाजपसह इतर पक्षांना मदत करतात या कदीर मौलाना यांच्या आरोपाची दखल घेत कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगांवकर यांनी " अशा लोकांना जागा दाखवू' असा इशारा दिला. निष्ठावंतांना पक्षात मान सन्मान दिला जाईल असा शब्द देखील त्यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com