Aurangabad Municipal commissioner troubled by roaming calls for water | Sarkarnama

औरंगाबादच्या आयुक्तांना चीनमध्ये फोनने भंडावून सोडले, म्हणे नळाला पाणी आले नाही ..... 

जगदीश पानसरे :सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 जुलै 2017

असाच एक नवा क्रमांक घेणे महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर यांना चांगलेचडोकेदुखीचे ठरले. पाच दिवसांच्या चीन दौऱ्यात या क्रमांकवर त्यांना शहरातील एका वार्डातून "आमच्या गल्लीत पाणी आले नाही, कचरा उचलला नाही'
अशा दैनंदिन तक्रारींचे किमान शंभर फोन आले

औरंगाबाद : महापौर, आयुक्त व इतर सदस्यांचा चीन दौरा जसा विरोधामुळे गाजला तसा तो तिथे झालेल्या गंमती जमतीमुळेही सध्या गाजतोय.

 विदेशात गेल्यावर रोजच्या कामातून उसंत आणि अभ्यास दौऱ्यावर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून उच्चपदस्थ अधिकारी तात्पुरता नवीन मोबाईल क्रमांक वापरतात.

असाच एक नवा क्रमांक घेणे महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर यांना चांगलेचडोकेदुखीचे ठरले. पाच दिवसांच्या चीन दौऱ्यात या क्रमांकवर त्यांना शहरातील एका वार्डातून "आमच्या गल्लीत पाणी आले नाही, कचरा उचलला नाही'
अशा दैनंदिन तक्रारींचे किमान शंभर फोन आले होते.  अशी माहिती खुद्द आयुक्तांनीच दिली आहे . 

10 ते 17 जुलै दरम्यान, महापौर, महापालिका आयुक्त यांच्यासह पाचजणांचे शिष्टमंडळ चीन दौऱ्यावर गेले होते. नियमित मोबाईल नंबरवर सारखे फोन येतील, त्यांचा अभ्यास दौऱ्यात अडथळा नको म्हणून आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी एका अधिकाऱ्याला आपल्यासाठी तात्पुरते नवे सीमकार्ड आणण्यास  सांगितले होते. त्यानूसार अधिकाऱ्याने आयुक्तांना कार्ड आणून दिले.

त्यावर रोमिंगची सुविधा देखील कार्यन्वित करण्यात आली. चीनमध्ये दाखल होत नाही, तोच या नव्या क्रमांकावर धडाधड फोन येण्यास सुरुवात झाली. बर हे
फोन कशासाठी तर आमच्या गल्लीत आज पाणीच आले नाही, कमी दाबाने पाणी येतेये, वार्डातला कचराच साफ झाला नाही अशा कारणांसाठीचे होते.

चीन आणि भारताच्या घड्याळात तीन ते चार तासांचे अंतर आहे. त्यामुळे शहरातून फोन करणारी व्यक्ती रात्री किंवा भल्या पहाटे फोन करायची तेव्हा तिकडे रात्र किंवा मध्यरात्र असायची. त्यामुळे आयुक्तांना या नव्या सीमकार्डमुळे चांगलाच पश्‍चाताप सहन करावा लागला. पाच दिवसांत आपण किमान शंभर फोन कॉल अटेंड केल्याचे आयुक्तांनी सांगतिले.

तो नंबर लाईनमनचा

आयुक्तांनी ज्या अधिकाऱ्याकडे नव्या सीमची मागणी केली होती, त्या अधिकाऱ्याने जो नंबर दिला होता तो शहरातील एका वार्डात पाणीपुरवठा करणाऱ्या लाईनमचा होता. रोजचा संपर्क असल्याने नागरिक देखील लाईनमनच
बोलतोय समजून त्याच्याशी मोकळ ढाकळ बोलायचे. आयुक्तांच्या हा प्रकार लक्षात आला, पण त्यांनी त्रागा न करता आलेले फोन घेतले आणि चीनवरून आल्यावर तुमच्या पाण्याचे काय ते बघतो असे सांगून वेळ मारून नेली.

दौऱ्यावरून परतल्यावर आयुक्तांनी नंबर देणाऱ्या अधिकाऱ्याला बोलावून ही सगळी कहाणी सांगतिली तेव्हा मात्र त्या अधिकाऱ्याला चांगलाच घाम फुटला होता.

संबंधित लेख