aurangabad muncipal corporation | Sarkarnama

निपुण यांनी उगारला शिस्तीचा बडगा, करवसुलीतील दिरंगाईबद्दल अधिकाऱ्याचे निलंबन

माधव इतबारे
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : थकीत मालमत्ता कर वसुलीची शहरात मोहीम सुरू असतानाच महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी (ता. 13) प्रभाग तीनचे विशेष वसुली अधिकारी संजय जक्कल यांना निलंबित करण्याचे आदेश काढल्याने खळबळ उडाली आहे. कमी वसुलीमुळे आयुक्तांनी यापूर्वीच जक्कल यांना कारणे दाखवा नोटिसा बजावली होत्या. 

महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. कर वसुलीच होत नसल्याने शहरातील विकासकामांसाठी महापालिकेकडे पैसेच नाहीत. महापौर नंदकुमार घोडेले यांनी याबद्दल नुकतीच नाराजी व्यक्त करत दिवाळीनंतर विशेष कर वसुली मोहिम राबवणार असल्याचे सांगितले होते. त्यानूसार महापौर स्वतः देखील वसुलीपथका सोबत बड्या थकबाकीदारांकडे फिरत आहेत. 

मालमत्ता करापोटी महापालिकेने 2018-19 या वर्षासाठी 450 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दीष्ट ठरविले आहे. गेल्या काही महिन्यांपासून आयुक्तांनी वसुलीकडे विशेष लक्ष दिले असून, वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबतच त्यांनी महापालिका मुख्यालयातील अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. नऊ प्रभागांतील मोठ्या थकबाकीदारांच्या याद्या तयार करून या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र अपेक्षित वसुली होत नसल्याने आयुक्त नाराज आहेत. संजय जक्कल यांच्याकडे प्रभाग तीनची जबाबदारी होती. त्यांनी गेल्या दोन अडीच महिन्यात समाधानकारक काम न केल्याने आयुक्तांनी यापूर्वी पाच वेळा कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. 

मंगळवारी त्यांनी जक्कल यांच्या निलंबनाचे आदेश काढल्याने वसुली अधिकारी चांगलेच हादरले. जक्कल यांच्यासोबत अन्य एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती. मात्र केवळ तंबी देत त्या अधिकाऱ्याला कामाला लावण्यात आल्याचे समजते. 

संबंधित लेख