भगव्या फेट्यातील अब्दुल सत्तारांची बुलेट मतदारसंघात फिरली! 

भगव्या फेट्यातील अब्दुल सत्तारांची बुलेट मतदारसंघात फिरली! 

औरंगाबाद : सिल्लोड- सोयगाव मतदारसंघाचे कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडसह तालुक्‍यातील विविध गावात जाऊन शिवजयंती साजरी केली. डोक्‍यावर भगवा फेटा आणि हातात झेंडा घेऊन सहभागी झालेले सत्तार सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. 

सिल्लोड-शहरात शिवजयंतीची जोरदार तयारी दोन दिवसांपासून सुरु होती. सोमवारी (ता. 19) सकाळी अकरा वाजता युवा व्यापारी सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने भव्य वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हजारावर वाहनांचा समावेश असलेल्या या वाहन रॅलीत अब्दुल सत्तार देखील सहभागी झाले. 

डोक्‍यावर भगवा फेटा आणि झेंडा लावलेल्या बुलेटवर स्वार होत शास्त्री कॉलनी, टिळकनगर, शिक्षक कॉलनी, बायपास मार्गे ही वाहनफेरी म्हसोबा महाराज मंदिरात पोहचली. तिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. सायंकाळी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणूकीत देखील अब्दुल सत्तार उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com