aurangabad-maratha-reservation-jagnnath-sonawane-no-more | Sarkarnama

मराठा मोर्चातील औरंगाबादमधील जगन्नाथ सोनवणे यांचा मृत्यू

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

मराठा क्रांती मोर्चाच्या `रास्ता रोको' आंदोलना दरम्यान काल मंगळवारी (ता.२४) देवगांव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राषण करुन आत्महतेचा प्रयत्न केला होता. त्यांचा आज बुधवारी (ता.२५) पहाटे मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या `रास्ता रोको' आंदोलना दरम्यान काल मंगळवारी (ता.२४) देवगांव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राषण करुन आत्महतेचा प्रयत्न केला होता. त्यांचा आज बुधवारी (ता.२५) पहाटे मृत्यू झाला आहे.

सोमवारी (ता. २३) काकासाहेब शिंदे हे जलसमाधी आंदोलनात हुतात्मा झाले. त्यानंतर आंदोलनाचा भडका उडाला होता. वातावरण अद्यापही शांत झाले नसतानाच आता सोनवणे यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, यामुळे आता प्रशासना समोर पुन्हा आंदोलकाना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख