Aurangabad : Dalit workers protest against demolition of Ambedkar bhavan | Sarkarnama

आंबेडकर भवन, बुध्दभूषण प्रेस बचावसाठी दलित  संघटनांचा मोर्चा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 जून 2017

मुंबईतील आंबेडकर भवन व बुध्दभूषण प्रिटींग प्रेस या ऐतिहासिक वास्तू पाडल्याला आज वर्ष पुर्ण झाले आहे. या निमित्ताने औरंगाबादेत आंबेडकरवादी व डाव्या परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने "आंबेडकर भवन बचाव' भव्य मोर्चा काढण्यात आला.  दरम्यान आंबेडकर भवन पाडण्यासाठी कारवाई करणाऱ्या ट्रस्टीकडून ऐतिहासिक आंबेडकर भवनचा वारसा जपणार की नाही, या पुस्तकाचे लेखक महेश भारतीय व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात बदनामीचा खटला भरण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद/ मुंबई : मुंबईतील आंबेडकर भवन व बुध्दभूषण प्रिटींग प्रेस या ऐतिहासिक वास्तू पाडल्याला आज (ता. 25) जून रोजी वर्ष पुर्ण झाले आहे. या निमित्ताने औरंगाबादेत आंबेडकरवादी व डाव्या परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने "आंबेडकर भवन बचाव' भव्य मोर्चा काढण्यात आला. 

 

तत्कालीन माहिती आयुुक्त रत्नाकर गायकवाड यांची या दोन्ही वास्तु पाडण्यात मुख्य भूमिका असल्याने त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी गायकवाड यांना
तात्काळ अटक करावी अशी प्रमुख मागणी मोर्चेकरांकडून करण्यात आली.

 

25 जून 2016 रोजी मुंबईतील आंबेडकर भवन व बुध्दभूषण प्रिटींग प्रेसची इमारत पाडण्यात आली होती. या कारवाईत सहभागी असलेल्या रत्नाकर गायकवाड यांच्या विरोधात दलित समाजात प्रचंड रोष होता. त्यातूनच महिनभरापुर्वी औरंगाबादेतील शासकीय विश्रामगृहात रत्नाकर गायकवाड व त्यांच्या पत्नीवर भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. 

आंबेडकर भवन व बुध्दभूषण प्रिटींग प्रेसची वास्तू पाडण्याच्या घटनेस वर्ष झाल्या निमित्ताने आज सकाळी 11 वाजता दलित संघटनांच्या वतीने क्रांतीचौक ते
भडकलगेट दरम्यान मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या कार्यकर्ते व नागरिकांनी यावेळी राज्य सरकार व रत्नाकर गायकवाड यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. 

आंबेडकरी चळवळीचे स्फुर्तीस्थान असलेले आबंडेकर भवन व बुध्दभूषण प्रिटींग प्रेस पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड यांना तात्काळ अटक करा, भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणात
अडकल्यामुळे त्यांचा चौकशी करा, गायकवाड यांना  झालेल्या मारहाण प्रकरणी कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करणाऱ्या तत्तकालीन पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षकांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

 

आंबेडकर भवनाचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्‍यता 

मुंबई : आंबेडकर भवन पाडण्यासाठी कारवाई करणाऱ्या ट्रस्टीकडून ऐतिहासिक आंबेडकर भवनचा वारसा जपणार की नाही, या पुस्तकाचे लेखक महेश भारतीय व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात बदनामीचा खटला भरण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

इतकेच नव्हे तर ट्रस्टीने विविध  व्हॉटसअप आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या आंबेडकर भवन पाडल्याच्या विरोधात ज्यांनी ट्रस्टीला दोष दिला त्यांच्याही विरोधात खटला भरण्याचा दम दिला असल्याने हे प्रकरण राज्यात येत्या काळात चिघळणयाची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

ट्रस्टीकडून ऐतिहासिक आंबेडकर भवनचा वारसा जपणार की नाही ? या पुस्तकाचे लेखक महेश भारतीय तसेच भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला भरण्यासाठी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

यात आंबेडकर भवन संदर्भात खोटी व दिशाभूल करणारी माहीती वृत्तपत्र, पुस्तक व फेसबुक व्हॉट्‌सऍप माध्यमातुन प्रसिद्ध करून नागसेन सोनारे, डॉ. अभय बांबोले, योगेश वराडे,यांच्यासह ट्रस्टच्या पदाधिकार्यांची बदनामी चालवून त्यांच्या जिवाला समाजकंटकांकडुन धोका निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, आज आंबेडकर भवन पाडल्याच्या घटनेला एक वर्षे झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारिप बहुजन महासंघासह विविध पुरोगामी संघटनांनी आज काळा काळा दिवस पाळला. तर ट्रस्टीच्या विरोधात आक्रोश व्यक्‍त करत त्याविरोधात भर पावसात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यात मुंबईसह राज्यातून विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीची ऐतिहासिक अशी पार्श्‍वभूमी लाभलेल्या आंबेडकर भवनला पाडणाऱ्या ट्रस्टीला पाठिशी न घालता त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

 

संबंधित लेख