aurangabad corporation | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उद्धव ठाकरेंनी उद्या 288 विधानसभा क्षेत्राच्या संपर्कप्रमुखांची बोलावली तातडीने बैठक
धनगर आरक्षणासाठी विधान भवनाच्या गेटवर यशवंत सेनेच आंदोलन

औरंबादमध्ये श्रेयासाठी भाजपची चलाखी 

सरकारनामा न्यूजब्युरो 
बुधवार, 8 मार्च 2017

शिवसेना-भाजपमधील राज्यस्तरीय तणावाचा परिणाम महापालिकेतील कारभारावर होताना दिसत आहे. शहराला खड्डेमुक्त करण्यासाठी शासनाकडे 150
कोटींचा निधी महापालिकेने मागितला होता, पण शिवसेनेचा महापौर असताना निधी दिला तर त्याचे श्रेय देखील सेनेला जाईल या भीतीने भाजपने चलाखी करत
महापौरपद भाजपकडे येण्याचा वाट पाहिली. भगवान घडामोडे महापौरपदी विराजमान होताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने रस्त्यांचा प्रस्ताव मागून घेतला आणि 150
कोटींच्या निधीला तत्काळ मंजुरी देखील दिली. 

औरंगाबाद : शिवसेना-भाजपमधील राज्यस्तरीय तणावाचा परिणाम महापालिकेतील कारभारावर होताना दिसत आहे. शहराला खड्डेमुक्त करण्यासाठी शासनाकडे 150
कोटींचा निधी महापालिकेने मागितला होता, पण शिवसेनेचा महापौर असताना निधी दिला तर त्याचे श्रेय देखील सेनेला जाईल या भीतीने भाजपने चलाखी करत
महापौरपद भाजपकडे येण्याचा वाट पाहिली. भगवान घडामोडे महापौरपदी विराजमान होताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने रस्त्यांचा प्रस्ताव मागून घेतला आणि 150
कोटींच्या निधीला तत्काळ मंजुरी देखील दिली. 

शहराला खड्डेमुक्त केल्याशिवाय नागरी सत्कार स्वीकारणार नाही, अशी प्रतिज्ञा भाजपचे महापौर भगवान घडामोडे यांनी पदभार स्वीकारताना केली होती. त्यांच्या या
निर्णयाचे स्वागत खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. शिवाय केवळ शपथ घेऊन थांबू नका तर निधीसाठी सरकारकडे पाठपुरावाही करा अशा सूचना देखील
दिल्या होत्या. विशेष म्हणजे या निधीसाठी सुरुवातीपासूनत भाजपने स्वतंत्रपणे पाठपुरावा केला होता. शिवसेनेला डावलून निधी मिळवायचा आणि त्याचे श्रेय लाटायचे
हा उद्देश त्यामागे होता. तो सफल होताना दिसत आहे. 

शहरातील रस्त्यांची यादी घेऊन महापौर घडामोडे, भाजपचे पुर्वमधील आमदार अतुल सावे व इतर पदाधिकारी मंगळवारी मुंबईत गेले होते. अर्थमंत्री मुनगंटीवार यांना
निवेदन देताच 150 कोटींचा निधी दोन टप्यात देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. आता भाजपचा महापौर असल्याने मुख्यमंत्र्यांनी हात सैल करत 150 कोटींचा निधी
मंजूर केला आहे. यातून खरेच शहर खड्डेमुक्त होते की शहरवासीयांच्या नशिबी पुन्हा तेच धक्के येतात हे लवकरच स्पष्ट होईल. 

संबंधित लेख