अण्णा मनमिळावू, आम्हा सर्वांची काळजी घेतो : अरुणा खैरे 

अण्णा (खासदार चंद्रकांत खैरे) खूप मनमिळावू आहे, आम्हा सगळ्या बहिणींची तो खूप काळजी घेतो. त्याला राग येतो; पण राग क्षणिक असतो आणि लगेच शांतही होतो. लहानपणासून आजतागायात राखी पौर्णिमा आणि भाऊबीज हे सण त्याने कधीच चुकवले नाही. अगदी मंत्री असतानासुध्दा या दोन सणांना अण्णा घरी येतोच. शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मोठ्या भगिनी अरुणा खैरे यांनी `सरकारनामा'शी बोलताना राखी पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
अण्णा मनमिळावू, आम्हा सर्वांची काळजी घेतो : अरुणा खैरे 

औरंगाबादः अण्णा (खासदार चंद्रकांत खैरे) खूप मनमिळावू आहे, आम्हा सगळ्या बहिणींची तो खूप काळजी घेतो. त्याला राग येतो; पण राग क्षणिक असतो आणि लगेच शांतही होतो. लहानपणासून आजतागायात राखी पौर्णिमा आणि भाऊबीज हे सण त्याने कधीच चुकवले नाही. अगदी मंत्री असतानासुध्दा या दोन सणांना अण्णा घरी येतोच. शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मोठ्या भगिनी अरुणा खैरे यांनी `सरकारनामा'शी बोलताना राखी पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

त्या म्हणाल्या, की सर्वात मोठी बहीण महानंदा मोरे, मी स्वतः अरुणा, माझ्यानंतर सुर्यकांत, मग चंद्रकांत आणि शारदा, यमुना सोनवणे अशी आम्ही सहा बहिण भावंड. पैकी सुर्यकांत यांचे निधन झाले आहे. लहानपणापासून आम्ही एकमेकांसाबेत खेळत, कधी भांडत लहानचे मोठे झालो. भाऊ म्हणजे आमचे वडील कडक शिस्तीचे, तर आई वत्सला नावाप्रमाणेच वात्सल्य मुर्ती. 

मछली खडक इथल्या घरी आमचे सगळे सण एकत्रितपणे साजरे व्हायचे. आजही ते होतात. यात काहीही बदल झालेला नाही. अगदी अण्णा राजकारणात येण्याच्या आधीपासून आम्ही राखी पौर्णिमा, भाऊबीज कित्येक वर्षांपासून साजरी करतो. राजकारणामुळे मला वेळच मिळत नाही, म्हणून अण्णाने आम्हा बहिणींच्या हातून राखी बांधून घेतली नाही, किंवा भाऊबीजीला ओवाळून घेतले नाही असे कधीच झाले नाही. 

अगदी मंत्री झाल्यावरही सगळी काम बाजूला टाकून या दोन सणांच्यावेळी अण्णाने आपल्या बहिणीला वेळ दिला आहे. राजकारण, कामाचा व्याप, रोज भेटायला येणारी हजारो लोक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी हा अण्णाच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला असला तरी कुटुंब आणि त्यातील सदस्यही त्याच्यासाठी तितकेच महत्वाचे. 

राखी पौर्णिमा, भाऊबीजेला आम्हाला ओवळणी म्हणून साड्या आणण्याचे अण्णा कधी चुकला नाही. आता त्याला स्वतःला वेळ नसल्यामुळे कार्यालयातील इतरांकडे त्याने ही जबाबदारी सोपवली आहे. त्यात कुठे थोडी चूक झाली, तर मात्र अण्णा कमालीचा चिडतो. त्याच्या स्वभावाबद्दल सांगायच म्हटलं तर मनमिळावू, कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेणारा आणि आईवर प्रचंड श्रध्दा असणारा असा आमचा भाऊ आहे. 

कितीही घाई असली तरी घरातून बोहर पडताना आईच्या (वत्सला खैरे) पायावर डोके ठेवून दर्शन घेतल्याशिवाय अण्णा घराच्या बोहर पडत नाही. गेल्या अनेक वर्षापासूनचा हा शिरस्ता कायम आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com