Aurangabad BJP corporator's new funda | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

स्वच्छ वॉर्डासाठी राठोड यांनी नागरिकांना  दाखवला चित्रपट  'टॉयलेट एक प्रेमकथा' 

जगदीश पानसरे : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

प्रत्यक्षात चित्रपटातून धडा घेऊन लोक जेव्हा  स्वच्छतागृहाचा  वापर करतील तेव्हा प्रमोद राठोड  यांच्या उपक्रमाला यश मिळाले असे म्हणता येईल.

 

औरंगाबाद  :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते देशभरात आपापल्या पद्धतीने  कामाला लागले आहे. औरंगाबादेतील भाजपचे माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी स्वच्छतेसाठी नावाचं फंडा वापरलाय .  

आपल्या वॉर्डातील एक हजार नागरिकांना  "टॉयलेट एक प्रेमकथा'  हा चित्रपट मोफत दाखवण्याचा उपक्रम राबवला आहे. 

शहरातील अद्यावत वॉर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एन-3, एन-4 भागातून गेल्यावेळी प्रमोद राठोड नगरसेवक म्हणून निवडून आले होते. कालांतराने हा वॉर्ड महिला राखीव झाला आणि राठोड यांना विश्रांतीनगर भागातून निवडणूक लढवावी लागली. झोपडपट्टी व स्लम अशी ओळख असलेल्या या 92 क्रमांकाच्या वार्डात स्वच्छतागृहाचा वापर न करता  उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची समस्या नगरसेवक म्हणून राठोड यांना कायम सतावत असते.

येथील नागरिकांना स्वच्छतागृहाचे महत्व पटवून सांगण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या योजनेतून स्वच्छतागृह बांधण्यासाठी वार्डातील लोकांना त्यांनी प्रोत्साहन देखील दिले. पण पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. 

' टॉयलेट' ने काम सोपे होणार? 

स्वच्छतागृह वापराचे महत्व पटवून जनजागृती करणारा अक्षय कुमार व भूमी पेडणेकर यांचा  "टॉयलेट एक प्रेमकथा' हा चित्रपट सध्या देशभरात चांगलाच गल्ला जमवतोय. उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांना वैतागलेल्या प्रमोद राठोड यांनी मग शक्कल लढवत वार्डातील एक हजार नागरिकांना हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला.

 जेणेकरून लोकांना स्वच्छतागृहाचे महत्व समजेल आणि ते उघड्यावर बसणे टाळतील. त्यांच्या या उपक्रमाला नागरिकांना भरपूर प्रतिसाद दिला. राठोड यांनी शहरातील पीव्हीआर चित्रपटगृहातील तीन शो बुधवारी  बुक केले होते.

विशेष म्हणजे विश्रांतीनगरमधील पुरुष, महिला, वयोवृध्द व लहान मुलांना देखील त्यांना आर्वजून टॉयलेट एक प्रेमकथा चित्रपट पाहण्यासाठी येण्याचा आग्रह केला. लोकांनी मोफत चित्रपट उपक्रमाला तर भरघोस प्रतिसाद दिला आहे.

संबंधित लेख