aurangabad-agitation-against-constitution-burnt-incident | Sarkarnama

संविधान जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; औरंगाबादेत निदर्शने  

सरकारनामा ब्युरो
रविवार, 12 ऑगस्ट 2018

दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर संविधान जाळणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करत दलित संघटनांनी शहरातील भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रविवारी (ता.12) तीव्र निदर्शने केली. तसेच मनुस्मृतीचे दहन करत निषेध नोंदवला. 

औरंगाबादः दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर संविधान जाळणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करत दलित संघटनांनी शहरातील भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रविवारी (ता.12) तीव्र निदर्शने केली. तसेच मनुस्मृतीचे दहन करत निषेध नोंदवला. 

संविधान जाळण्याच्या प्रकारामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी विविध संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. औरंगाबादेतदेखील या कृतीचा निषेध करण्यासाठी सर्व आंबेडकरी पक्ष आणि संघटनेच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. 

संविधान जाळून देशाचा अपमान करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला. संविधानाचे सामुहिक वाचन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

संबंधित लेख