aurangaba mla jalil election | Sarkarnama

लोकसभा नको विधानसभाच लढणार : इम्तियाज जलील 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद ः औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढायची म्हणाल तर तेवढी पक्षाची अजून तयारी नाही आणि ग्रामीण भागात ताकदही नाही अशी कबुली देतानाच 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याचा आपला कोणताही विचार नाही, मी विधानसभाच लढवणार अशी माहिती "एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील यांनी "सरकारनामा'ला दिली.. 

औरंगाबाद ः औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढायची म्हणाल तर तेवढी पक्षाची अजून तयारी नाही आणि ग्रामीण भागात ताकदही नाही अशी कबुली देतानाच 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याचा आपला कोणताही विचार नाही, मी विधानसभाच लढवणार अशी माहिती "एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील यांनी "सरकारनामा'ला दिली.. 

गेल्यावर्षी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत "एमआयएम' ला राज्याच्या विविध भागात यश मिळाले. अगदी नंदूरबार, धुळे सारख्या आदिवासी भागात देखील आमचे नगरसेवक निवडून आले आहेत असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीला अद्याप दीडवर्षे बाकी आहेत. भाजप, शिवसेनेसह अन्य पक्षांनी उमेदवारांचा शोध सुरु केला आहे. औरंगाबाद लोकसभेत स्वतंत्र उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केलेली असताना "एमआयएम' ची भूमिका काय असणार? असे विचारता जलील म्हणाले, की शहरात पक्षाची ताकद आहे, त्या तुलनेत ग्रामीण भागात आमचे संघटन अद्याप पोहचलेले नाही. त्यामुळे सध्या तरी औरंगाबाद लोकसभा लढवण्याचा पक्षाचा विचार नाही मात्र, याबाबत पक्षाचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी जो निर्णय घेतील त्यानूसारच पुढची दिशा ठरेल. 

नांदेडमधील पराभव स्थानिक नेतृत्वामुळे 
नुकत्याच झालेल्या नांदेड वाघाळा महापालिकेतील "एमआयएम'च्या पराभवावर बोलताना स्थानिक नेतृत्वावर असलेली लोकांची नाराजी त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे जलील यांनी सांगितले. निवडणुकीच्या तीन महिने आधी जेव्हा मी नांदेडमध्ये गेलो होतो, त्याचवेळी लोकांनी स्थानिक नेतृत्व बदलण्याची मागणी केली होती. पण ऐन निवडणुकीच्या तोडांवर कुठालाही निर्णय घेणे पक्षाला मारक ठरणार होते. त्यामुळे निवडणुकीनंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन आम्ही जनतेला दिले होते. त्यांना ते मान्य झाले नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत फटका बसणार याचा अंदाज आम्हाला तेव्हाच आला होता. लोक पक्षावर नाही तर स्थानिक नेतृत्वावर नाराज होते. त्यामुळेच एमआयएम मधून कॉंग्रेसमध्ये गेलेले 11 पैकी 8 नगरसेवक निवडूण आले. ते आमचे होते, तरी लोकांनी त्यांना निवडूण दिले. नांदेडमधील पक्षाच्या पराभवाचा परिणाम राज्यात कुठे होण्याची शक्‍यता अजिबात नसल्याचेही इम्तियाज म्हणाले. 

अशोक चव्हाण आणि कॉंग्रेसच्या यशात शिवसेनेचा मोलाचा वाटा होता. शिवसेनेने अनेक वार्डात डमी उमेदवार दिल्याचा आरोप देखील इम्तियाज यांनी केला. 
 

संबंधित लेख