अण्णा आज असते, तर किती आनंद झाला असता... 

एकीकडे मुंबईत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरू होता, तर दुसरीकडे आमदार अतुल सावे यांच्या आई लीलावती या सकाळपासूनच टीव्हीसमोर "त्या' क्षणाची वाट पाहत होत्या. आपला मुलगा कधी मंत्रीपदाची शपथ घेतोय, असं त्यांना झालं होतं. अखेर तो क्षण त्यांनी टीव्हीवर डोळे भरून पाहिला आणि आनंदाच्या भरात त्यांच्या तोंडून वाक्‍य बाहेर पडलं, ""आज अण्णा असते, तर त्यांना किती आनंद झाला असता!''
अण्णा आज असते, तर किती आनंद झाला असता... 

औरंगाबाद : एकीकडे मुंबईत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरू होता, तर दुसरीकडे आमदार अतुल सावे यांच्या आई लीलावती या सकाळपासूनच टीव्हीसमोर "त्या' क्षणाची वाट पाहत होत्या. आपला मुलगा कधी मंत्रीपदाची शपथ घेतोय, असं त्यांना झालं होतं. अखेर तो क्षण त्यांनी टीव्हीवर डोळे भरून पाहिला आणि आनंदाच्या भरात त्यांच्या तोंडून वाक्‍य बाहेर पडलं, ""आज अण्णा असते, तर त्यांना किती आनंद झाला असता!'' 

राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांच्या आईंशी रविवारी (ता. 16) संवाद साधला. "उद्योजक ते राजकारणी' असा सावे परिवाराचा प्रवास आहे. लीलावतीबाईंचे पती मोरेश्‍वर सावे हे शिवसेनेचे खासदार होते. त्यांचाच राजकारणाचा वारसा मुलगा अतुलकडे आला. वीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठेने काम करणाऱ्या अतुल सावे यांना त्याचे फळ मंत्रिपदाच्या रुपाने आज मिळाले, असे त्या म्हणाल्या. 

"अंजली व मीनल या दोघी सुनांबरोबर टीव्हीसमोर बसून अतुलचा शपथविधी टीव्हीवर पाहिला. चार वर्षांपुर्वी अतुल आमदार झाला. वडिलोपार्जित पुण्याई त्याच्या कामी आली. वडिलांचे संस्कार घेऊन त्याने पक्षाचे काम केले. म्हणूनच जनतेने त्याला निवडून दिले. अतुल आमदार झाल्यानंतर घरात आनंदाचा क्षण होता. अण्णा असते तर तो आनंदच आणखी वेगळा असता,'' असे बोलताना लीलावती सावे भावनिक झाल्या होत्या. 

"अतुलचा शपथविधी पार पडल्यावर अण्णांचे तेव्हाचे खास मित्र बेलसरे, मंडाळे, बसैय्ये बंधु, कुलकर्णी या सगळ्यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. त्या सगळ्यांनाही आज अण्णांची उणीव भासली. ते असते तर आज सोन्याचा दिवस असता, असे सगळे बोलले. बसैय्ये बंधुनी तर अण्णांच्या फोटोला हार घातला.'' हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com