atul bhatkhalkar | Sarkarnama

आजचा वाढदिवस ः

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 मार्च 2018

 

अतुल भातखळकर, 
आमदार, कांदिवली पूर्व (मुंबई) 

 

अतुल भातखळकर, 
आमदार, कांदिवली पूर्व (मुंबई) 

अतुल भातखळकर ही प्रदेश भाजपची थिंक टॅंक म्हणून ओळखली जाते. भाजपची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मुद्देसुदपणे मांडणारे प्रभावी वक्ते आणि प्रवक्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रीय स्वंवसेवक संघाचे स्वयंसेवक ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. भाजपमध्ये त्यांनी आतापर्यंत अनेक सन्मानाची पदे भूषविली. प्रदेश भाजपचे प्रवक्ते म्हणून तर ते सर्वांनाच परिचित आहेत. काहीसे शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पक्षात काम करताना त्यांनी कधी पदाची अपेक्षा धरली नाही. भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करीत असलेल्या या निष्ठावंत नेत्याला पक्षाने मुंबईतील कांदिवली (पूर्व) विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांच्यावर मतदारांनी विश्वास दाखविला. आमदार म्हणून ते निवडून आले. आमदार बनल्यानंतर त्यांनी मतदारसंघातही विविध उपक्रम राबविले. महिला बचत गट हा त्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम. एक राजकीय नेत्याबरोबर लिखान, वाचन हा छंदही ते नेहमीच जोपासत आलेत. भाजपचा माध्यमातील चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. 
 
 

संबंधित लेख