attack on dcp pournima chaugule in solapur | Sarkarnama

पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या गाडीवर दगडफेक 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

सोलापूर : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला काल हिंसक वळण लागले. शिवाजी चौक, निराळे वस्ती परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्या. गुन्हे शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्यावर वाहनावर आंदोलकांनी दगडफेक केली. 

सोलापूर : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला काल हिंसक वळण लागले. शिवाजी चौक, निराळे वस्ती परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्या. गुन्हे शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्यावर वाहनावर आंदोलकांनी दगडफेक केली. 

बंदच्या पार्श्‍वभूमीवर शिवाजी चौक परिसरातून सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, श्रीकांत घाडगे यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेवून नवी वेस पोलिस चौकीत आणले. सत्तर फूट भाजी मार्केट परिसरात दुकान बंद करण्याचे आवाहन करत फिरणाऱ्या माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह कार्यकर्त्यांना जेलरोड पोलिसांनी ताब्यात घेतले.

शिवाजी चौक परिसरातील पोलिस बंदोबस्त आणि दगडफेकीच्या घटनेची छायाचित्रे काढून व्हॉट्‌स ऍपवर व्हायरल करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घोषणात देत शितल हॉटेलच्या इमारतीवरील काच फोडणाऱ्या तरुणालाही पाठलाग करून पोलिसांनी ताब्यात घेतले. आडवा नळ, मजरेवाडी परिसरात टायर पेटवून रस्ता अडविण्याचा प्रयत्न झाला. बंदच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी प्रमुख चौकांसह 52 ठिकाणी फिक्‍स पॉईंट लावले आहेत.

शिवाजी चौक, निराळे वस्ती परिसरात सकाळपासून तणावाचे वातावरण असून प्रत्येक हालचालीवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर लाठीमारही करण्यात येत आहे. हुल्लडबाजांना पांगविण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. पुढील आदेश येईपर्यंत बंदोबस्त चालू ठेवण्याची सूचना पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख