ATS takes Shrikant Pangarkar in custody | Sarkarnama

एटीएसने ताब्यात घेतलेला श्रीकांत पांगारकर शिवसेनेचा माजी नगरसेवक 

सरकारनामा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

नालासोपारा यथील स्फोटक आणि शस्त्रास्त्र साठ्याचा तपास  करणाऱ्या एटीएसच्या पथकाने संशियत म्हणून शनिवारी  (ता.18) रात्री आणखी एकास चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.

औरंगाबादः नालासोपारा यथील स्फोटक आणि शस्त्रास्त्र साठ्याचा तपास  करणाऱ्या एटीएसच्या पथकाने संशियत म्हणून शनिवारी  (ता.18) रात्री आणखी एकास चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. श्रीकांत पांगारकर असे या व्यक्तीचे नाव असून तो जालना नगर परिषदेतील शिवसेनेचा माजी नगरसेवक असल्याची माहिती समोर आली आहे. 

पांगारकर यास  दाभोळकर हत्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे की शस्त्रात्रं  साठ्याच्या प्रकरणात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पण  दाभोळकर हत्या प्रकरणात  पांगारकर याचा काही सहभाग होता काय या दृष्टीने तपस सुरु आहे .  

एटीएसच्या पथकाने शनिवारी रात्री औरंगाबाद येथील विभागीय क्रिडा संकुलासमोर असलेल्या ज्ञानेश्‍वरनगरातून पांगारकर यास ताब्यात घेतले.  श्रीकांत पांगारकर तेथे  भाड्याने राहत होते . रात्रीच एटीएसने त्याला जालन्याला नेऊन त्याच्या घराची झाडाझडती घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्याला सोबत घेऊन हे पथक पुण्याला गेले. 

श्रीकांत पांगारकर हा मुळचा जालन्याचा असून शहरातील महसुल कॉलनीत पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आईसह तो इथे राहत होता. 2001 ते 2011 दरम्यान, तो जालना नगरपरिषदेत शिवसेनेचा नगरसेवक म्हणून कार्यरत होता. पण गेल्या तीन वर्षापासून तो जालन्या ऐवजी औरंगाबादेत वास्तव्यास आहे. 

पुढे पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्याने राजकारण सोडून हिंदू जनजागृती संघटनेचे काम सुरू केले होते. गोव्यातील तिसऱ्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी होऊन त्याने भाषण केल्याचीही माहिती आहे. त्याचे शालेय शिक्षण जालन्याच्या सरस्वती भुवन शाळेत झाले असून तो पदवीधर आहे. 
 

संबंधित लेख