atalbihari vajapeyi final rituals | Sarkarnama

अटलबिहारी वाजपेयी अमर रहे : लाडक्या लोकनेत्याला प्रचंड गर्दीत शेवटचा निरोप

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

अटलबिहारी वाजपेयी यांच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी वाजपेयी यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. वाजपेयी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पावसानेही हजेरी लावली. धुराच्या रेषा हवेत जाऊ लागल्या तसा या लोकनेत्याचा एकेक कण पंचत्त्वात विलीन होऊ लागला.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात दिल्ली येथी राष्ट्रीय स्मृती स्थळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. थोर मुत्सद्दी, देशभक्त नेता, प्रभावी वक्ता, कवी मनाचा पण कठोर निर्णय घेणारा प्रशासक आज काळाच्या पडद्याआड गेला.

नवी दिल्ली बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या लोकनेत्याला आदरांजली वाहण्यासाठी रस्त्यावर आली होती. राष्ट्रपतींपासून ते सामान्य नागरिकांच्या मनात वाजपेयींनी घर केले होते. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी, आवडत्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा अाणि अन्य मंत्री तर अंत्ययात्रेत पायी चालत सहभागी झाले. अटल बिहारी वाजपेयी अमर रहे, अशा घोषणा देत गर्दीने त्यांना श्रद्धांजली वाहिली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवानी, मनमोहनसिंग, राहुल गांधी, विविध राज्यांचे राज्यपाल, सार्क देशांचे प्रतिनिधी आदी प्रमुख या अंत्यसंस्काराच्या वेळी प्रसंगी उपस्थित होते. सुरक्षा दलाच्या ३०० जवानांनी वाजपेयी यांना मानवंदना दिली.  

 

वाचा आधीची बातमी - देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच अंत्ययात्रेत पायी चालले : मोदींच्या गुरूभक्तीची चर्चा

अटलजी  सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी : उध्दव ठाकरे

अटलजींच्या पैशात बकरा मोत्यांच्या माळा मिळाल्याच नाहीत.....

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख