atalbihari and dr vaze relation | Sarkarnama

वाजपेयींची ठसठसणारी जखम कोल्हापूरच्या डॉ. वझेंनी केली होती बरी 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

अटलबिहारी वाजपेयी यांचे कोल्हापूरशी अतूट नाते होते. येथील वि. ह. वझे यांच्याशी वाजपेयी यांचे एक वेगळे नाते होते. 

कोल्हापूर: अटलबिहारी वाजपेयी यांचे कोल्हापूरशी अतूट नाते होते. येथील वि. ह. वझे यांच्याशी वाजपेयी यांचे एक वेगळे नाते होते. 

वाजपेयी यांच्या कोल्हापूर दौऱ्यात एकदा त्यांना बुटाची जखम झाली होती. जखम छोटीशीच होती पण वाजपेयींना चालताना खूप त्रास देत होती. यावेळी डॉ. वि. ह. वझे यांनी स्वतः वाजपेयी यांच्यावर उपचार केले डॉ. वझे म्हणजे त्यावेळचे कोल्हापूरातले सर्वात मोठे डॉक्‍टर. पण या प्रसंगानंतर ते व वाजपेयी खूप जवळ आले. 

याचप्रमाणे राधेशाम मंगल कार्यालयाचे बापूराव जोशी यांचे शाकाहारी जेवण म्हणजे म्हणजे त्या काळात खूप चर्चेचे. पुरी, श्रीखंड, बटाट्याची पिवळी भाजी, काळा मसाला भात, गोडसर आमटी, कोशिंबीर हा जेवणाचा थाट बाबुराव जोशींनी प्रतिभानगर हॉल चालवण्यासाठी घेतला होता. तेथे या जेवणाचा आस्वाद वाजपेयींनी घेतला. 

वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांच्या या आठवणींना उजाळा मिळाला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख