Atal Bihari Vajpayee visited Nasik public library | Sarkarnama

वाजपेयी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात येतात तेंव्हा ... 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

एखाद्या वाचनालयासाठी एव्हढा प्रदिर्घ काळ उतार चढावांना सफलतापूर्वक पार करून वाटचाल करणे एक मोठी सफलता व उपलब्धी ठरते.

नाशिक : माजी पंतप्रधान अटलबिहारी बिहारी वाजपेयी नाशिकचे सांस्कृतिक दालन असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते होते. यावेळी पुस्तकांच्या दालनात वाजपेयीजी तासभर रमले होते  . 

वाजपेयी 17 मार्च, 1991 ला सावाना संस्थेच्या कार्यक्रमास आले होते यावेळी त्यांनी संस्थेच्या अभिप्राय वहीत पानभर व अभिप्राय नोंदवला. संस्थेच्या पदाधिका-यांनी आज तो नागरीकांसाठी सोशल मिडीयावर उपलब्ध केला. वाजपेयी वाचनालयाच्या वास्तू आल्यावर एव्हढे प्रभावीत झाले की त्यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा परिचय करून घेतला. तासभर पुस्तकांच्या दालनात रमले. सरकारकडून पुरेशी मदत मिळते का?. पुस्तकांची देखभाल कशी करतात अशी विविध माहिती घेतली.

वाजपेयी यांनी वाचनालयाच्या अभिप्राय वहीत नोंदविलेल्या हिंदी भाषेतील अभिप्राय असा,"नाशिक शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवात सहभागी होऊन खुप आनंद झाला. एखाद्या वाचनालयासाठी एव्हढा प्रदिर्घ काळ उतार चढावांना सफलतापूर्वक पार करून वाटचाल करणे एक मोठी सफलता व उपलब्धी ठरते.

संस्थेचे संस्थापक, संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी व सर्व सहकारी अभिनंदनास पात्र आहेत.वाचनालयासाठी शासनाकडून मिळणारे आर्थिक सहाय्य पुरेसे नाही.  पुस्तके महाग होत आहेत. त्यांच्या देखभालीचा खर्च वाढत आहे.  शासनाने वाचनालयाला मुक्त हस्ते साह्य दिले पाहिजे.  त्याचबरोबर पुस्तकांची निवड  व स्वातंत्र्य पूर्णता वाचनालयावर सोपविला पाहिजे." 
 

टॅग्स

संबंधित लेख