अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरूवारी औरंगाबादेत
माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या (ता.23) गुरूवारी औरंगाबादेत दर्शनासाठी येणार आहे. सकाळी 8 ते 11 या वेळात नागरिकांना वाजपेयींच्या अस्थिंचे दर्शन घेता येईल.
औरंगाबादः माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या (ता.23) गुरूवारी औरंगाबादेत दर्शनासाठी येणार आहे. सकाळी 8 ते 11 या वेळात नागरिकांना वाजपेयींच्या अस्थिंचे दर्शन घेता येईल.
अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट रोजी निधन झाले. देशभरात त्यांचे चाहते आणि समर्थक आहेत. दिल्लीत त्यांच्या अत्यंदर्शनासाठी देशभरातून लाखो लोक आले होते. तर अनेकांनी दुरचित्र वाहिन्यांच्या माध्यमातून त्यांचे अखेरचे दर्शन घेतले होते.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिंचे कलश दर्शनासाठी देशाच्या विविध भागात नेण्यात येणार आहे. औरंगाबादेत उद्या वाजपेयींचा अस्थिकलश येणार असून उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात तो दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
दुपारी जालना, परभणी व शुक्रवार 24 रोजी नांदेड येथे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर गोदावरी नदीच्या घाटावर वाजपेयींच्या अस्थि विसर्जित केल्या जाणार आहेत.