Atal Beheri Vajpayees Ashes will be brought to Pune | Sarkarnama

अटलजींचा अस्थी कलश दर्शनासाठी उद्या पुण्यात

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 आॅगस्ट रोजी सायंकाळी निधन झाले. 17 आॅगस्टला सायंकाळी नवी दिल्लीतील स्मृतीस्थळ येथे या लोकप्रिय नेत्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अस्थी उत्तर प्रदेशातील विविध नद्यांमध्ये विसर्जित करण्यासाठी नेण्यात आल्या. महाराष्ट्रातील काही नद्यांमध्येही अटलजींच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे.

पुणे : दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचा कलश उद्या (गुरुवार, ता. २३ ऑगस्ट) सकाळी साडेदहा ते दुपारी ३ या वेळेत जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान, भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 आॅगस्ट रोजी सायंकाळी निधन झाले. 17 आॅगस्टला सायंकाळी नवी दिल्लीतील स्मृतीस्थळ येथे या लोकप्रिय नेत्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अस्थी उत्तर प्रदेशातील विविध नद्यांमध्ये विसर्जित करण्यासाठी नेण्यात आल्या. महाराष्ट्रातील काही नद्यांमध्येही अटलजींच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे.

पालकमंंत्री गिरीश बापट सकाळी मुंबईहून पुण्याला अस्थी कलश आणणार आहेत. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. मुंबई, पुणे, पंढरपूर, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, मालेगाव, कर्जत, कराड, महाड व सांगली येथील नद्यांमध्ये अटलजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. अस्थी कलशाच्या पूजनानंतर तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीत अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख