Atal Behari Vajpayee Memories Nashik | Sarkarnama

...आणि वाजपेयींच्या ताटातल्या श्रीखंडाचा प्रसाद झाला

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

1990 मध्ये कार्यक्रमानिमित्त नाशिकला आले होते. यावेळी सिडकोतील खेतवानी लॉन्स येथे कार्यकर्ता परिचय व स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. शहरातील विविध मात्र मोजके कार्यकर्ते त्याला उपस्थित होते. आजच्या सारखे मोहोळ व मिरवुन घेणारे कार्यकर्ते अन्‌ पदाधिकारी त्यावेळी नव्हते. यावेळी वाजपेयी यांच्या भोजनात काय हवे, नको ते पाहण्याची जबाबदारी कार्यालयीन चिटणीस अरुण शेंदुर्णीकर यांच्याकडे होती

नाशिक : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींसमवेत कार्यकर्त्यांचा स्नेहभोजन होते. त्यात वाजपेयींचे भोजन झाल्यावर ताटात श्रीखंड तसेच शिल्लक होते. तेव्हा आपली परवानगी असेल तर प्रसाद म्हणुन हे श्रीखंड ग्रहण करु का? असे विचारत अरुण शेंदुर्णीकर यांनी ते श्रीखंड घेतले. वाजपेयी मधाळ दृष्टीने पहात राहिले. त्यांनी त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला. त्या मोरपिशी स्पर्शाच्या आठवणीने ते आजही मोहरुन गेले होते. शेंदुर्णीकर आजही नाशिक शहर भाजप कार्यालयाचे कार्यालयीन चिटणीस आहेत.

1990 मध्ये कार्यक्रमानिमित्त नाशिकला आले होते. यावेळी सिडकोतील खेतवानी लॉन्स येथे कार्यकर्ता परिचय व स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. शहरातील विविध मात्र मोजके कार्यकर्ते त्याला उपस्थित होते. आजच्या सारखे मोहोळ व मिरवुन घेणारे कार्यकर्ते अन्‌ पदाधिकारी त्यावेळी नव्हते. यावेळी वाजपेयी यांच्या भोजनात काय हवे, नको ते पाहण्याची जबाबदारी कार्यालयीन चिटणीस अरुण शेंदुर्णीकर यांच्याकडे होती. यावेळी घडलेल्या प्रसंग शेंदुर्णीकर यांनी सांगितला....

....वाजपेयींचे भोजन झाल्यावर ताटातील वाटीत श्रीखंड तसेच शिल्लक राहीले. तेव्हा मी म्हणालो, 'अटलजी आपकी संमती हो तो क्‍या ये श्रीखंड मै ग्रहण करु?' अटलजी म्हणाले, "अरे ये तो थाली मे बचा है. झुटा हुआ है' त्यावर मी म्हणालो, 'यह आपके दृष्टीसे झुटा है. मेरे लिए तो प्रसाद है' असे सांगत त्यांनी ते श्रीखंड खाल्ले. अटलजी निःशब्दपणे त्याकडे पहातच राहिले. त्यांनी प्रेमाने माझ्या पाठीवर हात फिरवला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख