asududin owaissy public meeting in miraj | Sarkarnama

मी मिरजेत आल्याने कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या पोटात दुखतेय : ओवैसी 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

राजीव गांधी, इंदिरा गांधींना मारणारे काय खात होते याचीही चौकशी करा. रवांडामध्ये कधीकाळी मोठे हत्याकांड झाले. भारताचाही रवांडा होईल अशी मला भीती वाटते. मुस्लिम बीफ खात असल्याने गुन्हेगारी वृत्तीचे होतात, असा आरोप संघाचे नेते करतात. मात्र, महात्मा गांधींची हत्या करणारा देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे काय खात होता याची मात्र चर्चा होत नाही अशा प्रश्‍नांची मालिकाच एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदउद्दीन ओवैसी यांनी आज येथे उभी केली. 

मिरज (सांगली) : "मिरजेत येताच कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पोटात दुखायला लागलेय. मला रोखण्यासाठी प्रयत्न केले गेले. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कधीपर्यंत सेना-भाजपला घाबरणार? ', असा सवाल एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदउद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला. 

येथील किसान चौकात आयोजित जाहीर सभेसाठी मोठी गर्दी झाली होती. आमदार इम्तियाज जलील या वेळी उपस्थित होते. 

राजीव गांधी, इंदिरा गांधींना मारणारे काय खात होते याचीही चौकशी करा. रवांडामध्ये कधीकाळी मोठे हत्याकांड झाले. भारताचाही रवांडा होईल अशी मला भीती वाटते. मुस्लिम बीफ खात असल्याने गुन्हेगारी वृत्तीचे होतात, असा आरोप संघाचे नेते करतात. मात्र, महात्मा गांधींची हत्या करणारा देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे काय खात होता याची मात्र चर्चा होत नाही अशा प्रश्‍नांची मालिकाच एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदउद्दीन ओवैसी यांनी आज येथे उभी केली. 

खासदार ओवेसी म्हणाले,"" राज्य घटना वाचविण्यासाठी माझा संघर्ष आहे. मला बोलण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. 2011 नुसार मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीची गती हिंदूंपेक्षा कमी आहे. त्यांचा वेग गाठायला आम्हाला दोनशे वर्षे लागतील. तरीही मुस्लिमांविषयी भीतीचे वातावरण तयार केले जातेय. तुम्हाला मुले जन्माला घालण्यास आम्ही अडवत नाही. आम्ही फक्त विकास मागतोय. महिलांना संरक्षण देण्यात मोदी अपयशी ठरले. जम्मूत चिमुरडीवर बलात्कार झाला. आरोपींच्या सुटकेसाठी भाजपचे नेते रस्त्यावर आले. त्या वेळी तुम्ही का गप्प बसला?'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख