assembly vice presdiden | Sarkarnama

शिवसेनेला विधानसभा उपाध्यक्षपदाचे गाजर ?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

मुंबई, : चार वर्षांपासून रिक्त असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद शिवसेनेच्या गळ्यात मारण्याचे नक्की झाले असून, भाजपने शिवसेनेला युतीच्या बेडीत अडकावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. 

मुंबई, : चार वर्षांपासून रिक्त असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद शिवसेनेच्या गळ्यात मारण्याचे नक्की झाले असून, भाजपने शिवसेनेला युतीच्या बेडीत अडकावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. 

विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घोषणा केली असून, या पदावर शिवसेनेचे पारनेरचे आमदार विजय औटी यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे, तर विधान परिषद उपसभापतीच्या निवडीचा कार्यक्रम उद्या (ता.29) रोजी सभापती रामराजे निंबाळकर जाहीर करण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत असून, ते पद शिवसेनेला देण्याची शक्‍यता सत्ताधारी भाजप गोटातून वर्तवली जात आहे. तरीही सत्ताधारी भाजप व शिवसेना यांचे आणि विरोधी बाकावरील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे सदस्य बळ सारखे असल्याने अपक्षांना आणि भाजपच्या सहयोगी सदस्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. 

विधानभेत भाजप 122 आणि शिवसेना 63 यांचे संख्याबळ विरोधकापेक्षा तगडे असल्याने ही निवड बिनविरोध होण्याची शक्‍यता आहे. औटी यांचे नाव आघाडीवर असले तरीही, संजय शिरसाठ, सुभाष साबणे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. विरोधकांनी उमेदवार दिला तर निवडणूक शुक्रवारी होऊ शकते. मात्र ही शक्‍यता धूसर आहे. 

उपसभापतिपदी नीलम गोऱ्हे? 
उपसभापतिपदाच्या निवडीचा कार्यक्रम उद्या घोषित होण्याची शक्‍यता असून, निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. या पदावर शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांची निवड होण्याची शक्‍यता आहे. तरीही या पदासाठी नीलमताई यांच्यासह शिवसेनेचे गोपीकिसन बजोरिया हे देखील अर्ज दाखल करू शकतील. श्रीकांत देशपांडे अपक्ष म्हणून अर्ज दाखल करू शकतील. त्यामुळे निवडणूक होण्याची शक्‍यता असली तर या दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याकडे सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न असेल. सध्या भाजप 22, शिवसेना 12, कॉंग्रेस 17, राष्ट्रवादी कॉंग्रेस 17, शेकाप 2, लोकभारती 1 आदी असे बलाबल आहे.  
 

संबंधित लेख