Assembly question and answer session MLA Rahul KUL - Ram Shinde | Sarkarnama

दौंडच्या हरियाली योजनेतील  दोषींवर होणार कारवाई - राम शिंदे 

यशपाल सोनकांबळे : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

जलवाहिन्यांसाठी जिल्ह्यातच परवानगी द्या 
उजनी धरणाच्या पाणी फुगवटा क्षेत्रातील (बॅकवॉटर) व इंदापूर येथील वनक्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांना जलवाहिन्या टाकण्यासाठी नागपूर येथील वन विभागीय कार्यालयात परवानगी घेण्यासाठी जावे लागते. ही परवानगी जिल्हा स्तरावर देण्याची सुविधा करावी, असा औचित्याचा मुद्दा आमदार दत्तात्रेय भरणे यांनी उपस्थित केला. 

मुंबई    : पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत दौंड तालुक्‍यात हरियाली योजना राबविण्यात आली होती. यामध्ये किती लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला, त्यामध्ये दोषींवर काय कारवाई झाली, याबाबत आमदार राहुल कुल यांना विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना जलसंधारण मंत्री राम शिंदे म्हणाले, ""याप्रकरणी दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल.'' 

विधानसभेच्या प्रश्नोत्तर सत्रामध्ये कुल यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, ""दौंड तालुक्‍यातील खोर, बोरीऐंदी, भरतगाव, डाळिंब आणि भांडगाव या गावांध्ये 2008 ते 2013 या कालावधीत "हरियाली योजना' राबविण्यात आली होती. त्यामध्ये तत्कालीन ग्रामसेवकांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार जिल्हा ग्रामीण विकास विभागाला प्राप्त झाली. त्यानंतर या योजनेत एकूण 28 लाख 89 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास विभागाकडून चौकशी सुरू आहे. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.'' 

 

संबंधित लेख