Assembly may not function this week also | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

रायगडात सुनील तटकरे जिंकले
देशात 277 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर
देशात एनडीएचे 314 उमेदवार आघाडीवर असून यूपीएचे 112 उमेदवार आघाडीवर आहे.
पूनम महाजन - 850 मतांनी आघाडीवर, प्रिया दत्त पिछाडीवर
राहुल गांधी पिछाडीवरून पुन्हा आघाडीवर
पुणे : पहिल्या फेरित एनडीए तीनशे जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
रायबरेलीत सोनिया गांधी आघाडीवर आहेत
दक्षिण मध्य मुंबईत पहिल्या फेरीत शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे आघाडीवर...

दुसऱ्या आठवड्यातही अधिवेशानातील कामकाज रेंगाळणार?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 मार्च 2017

कर्जमाफीच्या घोषणेसाठी या आठवड्यातही विरोधक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तसेच भाजपची कोंडी करण्यासाठी सरकारविरोधी आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसकडून शिवसेनेलाही आवतण दिले जाणार आहे.

मुंबई - शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन हे दोन मुद्दे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपासून चांगलेच गाजले. यासंदर्भात आक्रमक होत विरोधकांनी आठवडाभर अधिवेशानाचे कामकाज रोखून धरले. सलग तीन दिवसांच्या विश्रांतीनतर बुधवारी तरी सुरळीतपणे अधिवेशन सुरु होईल, अशी सत्ताधाऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, सरकारच्या या अपेक्षेला सुरुंग लावण्याची रणनिती कॉंग्रेसने आखली आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यातही अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ कायम रहाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची रणनिती ठरविण्यासाठी बुधवारी सकाळी विधानभवनात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्दयावर सरकारला कोंडीत पकडण्याची भुमिका या बैठकीत घेतली जाण्याची शक्‍यता आहे. कर्जमाफीच्या घोषणेसाठी या आठवड्यातही विरोधक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तसेच भाजपची कोंडी करण्यासाठी सरकारविरोधी आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसकडून शिवसेनेलाही आवतण दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच योग्य वेळ असल्याचा दावा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केला आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला आहे. योग्य वेळ आली की कर्जमाफी करु, अशी सबब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नेहमी सांगितली जाते, याची आठवण विखे पाटील यांनी करुन दिली. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच कर्जमाफीसाठी योग्य वेळ असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख