Assembly discussion medical officer will be penalised for wrong information | Sarkarnama

चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार कारवाई : महाजन यांचे आश्वासन

सरकारनामा न्युज ब्युरो
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई   :   नागपूर येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असतानाही त्यासाठीची खोटी माहिती लक्षवेधीच्या उत्तरात देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे .

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार नागो गाणार  यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात या कारवाईचे आश्वासन आज विधानपरिषदेत दिले.

आमदार गाणार यांनी नागपूर  वैद्यकीय महाविद्यालयात बाह्य आणि अंतररुग्ण विभागात डॉक्टर नसल्याने  तेथे येणाऱ्या रुग्णाचे हाल होत असून आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, परंतु लक्षवेधीच्या उत्तरातील निवेदनात मात्र इथे सर्व सुरळीत असल्याची खोटी माहिती देण्यात  आली असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

अशा प्रकारची खोटी माहिती देणाऱ्या वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यावर  तातडीने कारवाई करावी अशी मागणी गाणार यांनी लावून धरली असता महाजन यांनी त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र नागपूरच्या भाजप आमदारांनी महाजन यांच्या उत्तरावर समाधान व्यक्त न करता आम्ही सभागृहात दिलेल्या माहितचे गांभिर्य लक्षात घेऊन यावर बैठक घ्यावी अशी मागणी केली .  

वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन यांनी नागपूर येथील रुग्णालयात सर काही अलबेल सुरू असून 1200 डॉक्टर काम करत असल्याची माहिती दिली .  परंतु भाजपाचे गिरीश व्यास आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी या विषयी आमदारांची बैठक लावून धरण्याची मागणी केली .  उपसभापती मणिकराव ठाकरे यांनी नागपूरच्या आमदारांची पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे मान्य केले . 

संबंधित लेख