assembly bjp and apposition face to face | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

विधिमंडळाच्या पायऱ्यावर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

मुंबई : मराठा समाजाचा आरक्षणाचा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यास सरकारने नकार दिल्याने आज विधिमंडळात प्रचंड गोंधळ झाला. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या समोर गेले.

मुंबई : मराठा समाजाचा आरक्षणाचा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यास सरकारने नकार दिल्याने आज विधिमंडळात प्रचंड गोंधळ झाला. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या समोर गेले.

मराठा आरक्षणाला खोडा घालत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर केला. सत्ताधारी सदस्यांनी यावेळी मुंडे यांना लक्ष्य केले. 

पायऱ्यावर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या समर्थनार्थ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा अहवाल पटलावर का मांडला जात नाही असा सवाल करीत जोरदार घोषणाबाजी केली. मात्र असेही चित्र पाहण्यास मिळाले. 

धनंजय मुंडे हे एकीकडे मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करतानाच खोडा घालत असल्याचा आरोपही सत्ताधारी सदस्यांनी केला. कधी नव्हे ते सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य विधिमंडळाच्या पायऱ्यावर दिसले. विधिमंडळात आज ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा कधी नव्हे तो गाजला. 

संबंधित लेख