asmita more in pune | Sarkarnama

नागरी पुरवठा मंत्र्यांच्या पुण्याला अखेर मिळाला पूर्ण वेळ अन्न धान्य वितरण आधिकारी

उमेश घोंगडे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे : पुण्याच्या अन्नधान्य वितरण आधिकारी म्हणून अस्मिता मोरे यांची नियुक्ती झाली आहे. मोरे यांच्या नियुक्तीने पुण्याला सुमारे वर्षभरानंतर पूर्णवेळ अन्नधान्य वितरण आधिकारी मिळाला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री असलेल्या शहरातच अनेक महिने पूर्णवेळ अधिकारी नव्हता. मोरे यांच्या नियुक्तीने ही उणीव आता भरून निघाली आहे. 

गेल्यावर्षी शहाजी मोरे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या या जागेवर रघुनाथ पोटे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आजारपणामुळे पोटे दीर्घ रजेवर होते. पोटे यांच्या जागी गेल्या आठवड्यात मोरे यांची बदली झाली आहे. मोरे या सध्या सातारा जिल्ह्यात वाई-महाबळेश्‍वरच्या प्रांताधिकारी म्हणून कार्यरत आहेत. येत्या काही दिवसात त्या सूत्रे स्वीकारणार आहेत. 

पुणे आणि पिंपरीची लोकसंख्या सुमारे साठ लाख इतकी आहे. सुमारे साडेनऊ लाख कार्डधारक आहेत. यातील अंत्योदय तसेच प्राधान्य गटात असलेल्या कार्डधारकांची संख्या तीन लाख 65 हजार 229 इतकी आहे. वरील दोन्ही गटातील शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य वितरण करण्यात येते. सुमारे वर्षभर एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या संबंधित कामाला पूर्णवेळ आधिकारी नव्हता. सीमा होळकर यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. 

पुण्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या शहरातच एक वर्षापासून आधिकारी नसल्याने हा विषय चर्चेचा बनला होता. मोरे यांच्या नियुक्तीने ही चर्चा थांबण्याबरोबरच शिधापत्रिका धारकांची कामे मार्गी लागण्यास मदत होईल. 

संबंधित लेख